आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना होमवर्क, उन्हात हिंडा, मनसोक्त डुंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम - उन्हात हिंडा, नदीत डुंबा, आयुष्य कसे आहे हे पुस्तके बाजूला ठेवून पाहा. प्रख्यात शायर निदा फाजली यांच्या या काव्यपंक्ती येथे अचूक लागू होतात.

इटलीतील एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळच्या सुट्यांमध्ये. डॉन बॉस्को शाळेचे शिक्षक सीझर केटा यांनी मुलांना होमवर्क म्हणून अनेक अनोखी आव्हाने दिली आहेत. या ‘लाइफ चेंजिंग होमवर्क’ची चर्चा संपूर्ण इटलीत होत आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य आनंददायी होण्यात मदत होतील असे १५ मुद्दे त्यांनी यात सांगितले आहेत. सीझर यांनी सांगितले की, कवितेद्वारे शिकवणार्‍या शिक्षकाची भूमिका रॉबिन विल्यम्सने ‘डेड पोएट्स सोसायटी’ या चित्रपटात केली आहे. त्यापासून प्रेरणा घेऊनच मुलांना या अपारंपरिक पद्धतीने शिकवण्याचा विचार माझ्या मनात आला. त्यानुसार त्यांनी काही मुद्दे तयार केले.

१. कधी सकाळी उठून समुद्रकिनारी फिरा : पाण्यावरपडणारी किरणे पाहा आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्यांच्याबाबत विचार करा.
२.नव्या शब्दांचा वापर : यावर्षीशिकलेल्या नव्या शब्दांचा वापर चर्चेत करा. मुक्त असल्याचा अनुभव येईल.
३.काही चांगले वाचा : स्वप्नंपूर्ण करण्यासाठी सुटी असते. फक्त वाचनासाठी वाचन नको, काही वाचाल तर आपण वेगळ्या उंचीवर आहोत, असे वाटेल.
४.दूर राहा : आयुष्यातनकारात्मकता आणतात असे लोक आणि परिस्थितीपासून.
५.भीती वाटल्यास चिंता नको : अशागोष्टी डायरीत लिहा. काही दिवसांनंतर त्या पुन्हा वाचल्यास भीती अकारण होती, असे जाणवेल.
६.मुक्तपणे नृत्य करा : डान्सफ्लोअरवर किंवा आपल्या खोलीत, पण वेड्यासारखे नृत्य करा.
७.उगवता सूर्य पाहा : शांतराहा, दीर्घ श्वास घ्या आणि निसर्गाचे आभार माना.
८.खूप खेळा : प्रसन्नराहा.
९.बोला : यादरम्यानतुम्हाला एखादी व्यक्ती विशेष वाटत असेल तर प्रामाणिकपणे त्याला सांगा, त्याला समजेल अथवा समजेल. यात यश मिळाल्यास मुद्दा क्रमांक ची अंमलबजावणी करा.
१०.आढावा : ज्यागोष्टी वाचल्या आणि शिकल्या त्यांची तुलना करा.
११.खूश राहा : अगदीचमकत्या सूर्यासारखे.
१२.शपथ घेऊ नका : गोष्टीनकोत, चांगले बनवून दाखवून द्या.
१३.चित्रपट पाहा : ज्यांतमनाला भिडणारे संवाद आहेत. उदा.इंग्लिशचित्रपट. भाषक कौशल्यात सुधारणांचा हा श्रेष्ठ उपाय आहे.
१४.स्वप्नं पाहा : तीपूर्ण करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करा.
१५.चांगले वागा : स्वत:शीहीआणि इतरांशीही.
बातम्या आणखी आहेत...