आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhatarpur Stones Used In Base Of Palm Jumeirah Of Dubai

दुबई : पाण्यावर साकारले शहर, भारतातील दगडांवर उभा आहे बेटाचा पाया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईतील पाम जुमेराह आयलंड. - Divya Marathi
दुबईतील पाम जुमेराह आयलंड.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएई दौऱ्यावरून परतले आहेत. दुबईला गेल्या काही वर्षांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, दुबईसाठी अत्यंत खास असलेल्या पाम जुमेराह या प्रकल्पाचा पाया मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्य़ातील दगडांवर उभा आहे. दुबईतील समुद्रामध्ये तयार करण्यात आलेल्या आयलंडसाठी मध्यप्रदेशातून हे दगड नेण्यात आले होते. अनेक वर्षे या बेटाचे काम सुरू होते. हे दगड गुजरातमधून जहाजांद्वारे दुबईला नेण्यात आले होते. छतरपूरहून एक दगड गुजरातच्या पोर्टवर पोहोचवण्यासाठी सुमारे 40 दिवस लागायचे.

दुबईमध्ये जेव्हा या ड्रीम प्रोजेक्टचे नियोजन सुरू झाले तेव्हा समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाणार नाहीत आणि एका जागी स्थिर राहतील अशा दगडांची आवश्यता होती. त्यावेळी जगभरात अशा प्रकारच्या दगडांसाठी शोध घेण्यात आला. दुबईला या दगडांचे सँपल मागवण्यात आले. या दगडांचा एक खास आकार असायला हवा असतो. मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील दगडांच्या खाणीतले दगड या चाचणीमध्ये पास झाले. त्यानंतर दे दगड विशेष आकारात कापून गुजरातच्या मार्गाने जहाजाद्वारे दुबईला पाठवण्यात आले. 20 ते 30 फूट आकाराचे हे दगड 30 ते 40 टनाचे होते.

पाण्यातील या बेटाची वैशिष्ट्ये
>पाम जुमेराह 5 किलोमीटर लांब आणि 5 किलोमीटर रुंद आहे. फुटबॉलच्या 800 मैदानांएवढे ते मोठे आहे.
>या आयलंडच्या पायाभरणीसाठी केवळ दगड आणि मातीचा वापर करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे स्टील किंवा सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही.
>हे आयलंड झाडाच्या आकाराचे आहे.
>या आयलंडवर शाहरुख खानसह अनेक सेलिब्रिटींची घरे आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या आयलंडचे काही PHOTOS