आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhota Rajan Blames Mumbai Police About Supporting Dawood

मुंबई पोलिसच दाऊदचे हस्तक, छाेटा राजनने केला आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाली/नवी दिल्ली - मुंबई पोलिसांतील काही लोक अजूनही दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आहेत, असा आरोप अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने केला आहे. मी दाऊदला घाबरत नाही. त्याच्याशी लढतच राहीन, असेही तो म्हणाला. दरम्यान, गुंडाच्या अाराेपाला उत्तर देण्याची गरज नसल्याचे मुंबई पाेलिस अायुक्त जावेद अहमद यांनी स्पष्ट केले.

‘राजनला मुंबईला आणण्यात येईल,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. मात्र बालीजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने त्याला आणण्यास उशीर होऊ शकतो, असे वृत्त आहे. दरम्यान, ‘मुंबई पोलिसांनी माझ्यावर अन्याय केला. मला न्याय देण्याची जबाबदारी भारत सरकारची आहे,’ असे राजनने माध्यमांशी बाेलताना सांगितले.

राजनचे गुंड अटकेत
छोटा राजनच्या गुंडांचे अटकसत्र सुरू झाले आहे. मुंबईत नीलेश पराडकर ऊर्फ शटल्याला अटक झाली.त्याच्यावर बिल्डरला १५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी अलाहाबादेत इंद्रेश, रमेश व सलीम या तीन शार्प शूटर्सना अटक केली.