आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजनला भारतात आणण्याची तयारी अंतिम टप्प्यात? डॉनला घेऊन CBI विमानतळाकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाली पोलिसांनी पकडलेला छोटा राजन - Divya Marathi
बाली पोलिसांनी पकडलेला छोटा राजन
बाली/नवी दिल्ली - इंडोनेशियाच्या बाली येथे पकडला गेलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. सोमवारी सीबीआय आणि मुंबई पोलिसांचे एक पथक बाली येथील तुरुंगात पोहोचले. हे पथक रविवारी इंडोनेशियात पोहोचले होते. वृत्तवाहिण्यांच्या रिपोर्टनूसार डॉन छोटा राजनला भारतात आणण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याला विशेष विमानाने आणले जाणार असल्याची चर्चा आहे. या आठवड्यात राजनला मुंबईत आणले गेले तर कित्येक वर्षानंतर त्याची दिवाळी भारतात होईल.
पथकात कोण-कोण
पथकात सीबीआय, मुंबई पोलिस आणि भारतीय दुतावासातील अधिकारी आहेत. जकार्ता येथील भारतीय दुतावासातील अधिकारी संजीव अग्रवाल यांनी रविवारी तुरुंग अधिकाऱ्यांची भेट घेतली होती, ते राजनला देखील भेटले. राजनला परत आणण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरु होत आहे.
स्नायपर्सच्या बंदोबस्तात आणणार भारतात
इंडोनेशियात अटक करण्यात आलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला स्नायपर्सच्या बंदोबस्तात भारतात आणले जाईल. सूत्रांच्या माहितीनूसार, राजनला भारतात आणण्यासाठी इंडोनेशियात पोहोचलेल्या टीममध्ये तीन स्नायपर्स आहेत. त्यांचा अचूक निशाणा आहे. त्यासोबतच सीबीआय आणि पोलिस कमांडोज देखील या पथकात आहे. राजन च्या जीवाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदकडून धोका आहे. त्यामुळे त्याच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. (स्नायपर्सबद्दल जाणून घ्या, येथे क्लिक करुन)

राजनवर 75 गुन्हे
मुंबईत जन्मलेला छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे कधीकाळी दाऊदचा निकटवर्तीय होता. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दोघे वेगळे झाले. राजनवर मुंबईत हत्या, तस्करी, खंडणी, ड्रग्ज तस्करी यासारखे 75 गुन्हे नोंद आहेत.दोन दशकांपासून सुरक्षा यंत्रणांना चकमा देणाऱ्या राजनला इंटरपोलने काढलेल्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारेच अटक करण्यात आली. सध्या तो इंडोनेशियाच्या तुरुंगात आहे.

छोटा शकीलचे शार्पशुटर इंडोनेशियातच करु शकतात राजनवर हल्ला
छोटा राजनला सर्वात मोठा धोका दाऊदकडून आहे. दाऊदचा खास माणूस छोटा शकीलचे शार्प शुटर्स त्याच्यावर इंडोनेशियातच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो..