आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशिया: आज रात्री भारतात परतणार छोटा राजन, म्‍हणाला मी खुप आनंदी आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ बाली- इंडोनेशियाच्‍या बाली येथून कुख्‍यात डॉन छोटा राजन गुरुवारी रात्री भारतात परतणार आहे. त्‍याला डेनपसार पोलिसांच्‍या ताब्‍यातुन एअरपोर्टवर आणण्‍यात आले आहे. तेथुन भारतीय पोलिस आणि गुप्‍तचर संस्‍थेचे अधिकारी त्‍याला चार्टेड प्लेनने भारतात घेऊन येणार आहे.
छोटा राजनला भारतात आणण्‍यासाठी आधिपासुनच तयारी झालेली होती. परंतु मंगळवारी ज्वालामुखी फुटल्‍यानंतर आकाशात राख पसरल्‍याने बाली येथील सर्व विमान रद्द झाले होते. राजनला भारतात सुरूवातीला दिल्ली येथे आणले जाणार असल्‍याची माहिती मिळाली आहे.

छोटा राजनने म्‍हणाला मी खुप आनंदी आहे-
बाली पोलिसांच्‍या लॉकअपमधून गुरुवारी बाहेर आणल्‍यानंतर भारतात परण्‍यासाठी मी खुप आनंदी आहे असे त्‍याने माध्‍यमाला सांगिले आहे. मंगळवारी त्‍याने सांगितले होते की, ''मुंबई पोलिसांनी माझ्यावर खुप अत्याचार केले आहे. म्‍हणुन भारतात परतल्‍यानंतर त्‍याला मुंबईला जाण्‍यासाठी भीती वाटत आहे. त्‍याला दिल्‍लीला जायला आवडेल का? असे विचारले असता राजनने सांगितले की, ''मी दाऊदला नाही घाबरत. मी आयुष्‍यात आतिरेकीच्‍या विरूद्ध लढले आहे आणि या पुढे देखील लढेल. सरकारला वाटेल तेथे मला घेऊन जाऊ शकते परंतु मला न्‍याय पाहिजे. अशी संतप्‍त प्रतिक्रिया त्‍याने दिली.