आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhota Rajan Will Come In India In Security Of Commandos

‘कमांडों’च्या सुरक्षेत होणार छोटा राजनची वापसी, टीममध्ये ३ स्नायपर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाली/नवी दिल्ली - इंडोनेशियात अटकेत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला स्नायपर्स कमांडोंच्या सुरक्षेत भारतात आणले जाईल. अचूक नेमबाज असलेल्या या कमांडोंच्या गाेळीचा निशाणा सहसा चुकत नाही.

सूत्रांनुसार, राजनला भारतात आणण्यासाठी गेलेल्या पथकात तीन स्नायपर्सचा समावेश आहे. पथकात सीबीआय व काही पोलिस अधिकाऱ्यांसह इतर कमांडोंचाही समावेश आहे. दाऊद इब्राहिमच्या गुंडांपासून छाेटा राजनला धोका असल्याने सुरक्षेचे कडेकोट उपाय करण्यात आले आहेत. दरम्यान, एका वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या भारतीय दूतावासातील फर्स्ट सेक्रेटरी संजीव अग्रवाल यांनी रविवारी राजनची जकार्तामधील तुरुंगात भेट घेतली. राजनला कायदेशीर सल्लागार उपलब्ध करून देणे हा भारत सरकारचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. छोटा राजनवर मुंबईत खून, तस्करी, खंडणी व ड्रग्ज तस्करीसह सुमारे ७५ गुन्हे दाखल आहेत.

प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू
इंडाेनेशियातील भारतीय राजदूत गुरजितसिंह म्हणाले, राजनच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांत महत्त्वाच्या कागदपत्रांची देवाण-घेवाण केली जाईल. अन्सारी पाच दिवसांच्या दौऱ्यानिमित्त इंडोनेशियात पोहोचले अाहेत.