आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhota Rajan Will Handed Over To CBI First Then To Police

छोटा राजनला आधी दिल्लीतच आणणार, आधी सीबीआयकडे ताबा, नंतर पोलिसांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/बाली - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला थेट मुंबईला नेण्याऐवजी आधी दिल्लीतच आणण्याचा निर्णय सुरक्षा संस्थांनी घेतला आहे. त्याला आधी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात येईल आणि नंतर संबंधित गुन्ह्यांच्या तपासासाठी इतर पोलिस दलांकडे सोपवले जाईल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआय, केंद्रीय सुरक्षा संस्था तसेच दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. छोटा राजनला दिल्लीत सीबीआयच्या मुख्यालयात ठेवण्यात येईल. त्यादृष्टीने तेथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

राजनचे परतणे एक दिवस लांबणीवर
बालीजवळ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने तेथील विमानसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळ राजनचे भारतात परतणे आणखी एक दिवस लांबणीवर पडले आहे. राजनला मंगळवारी रात्रीच एका विशेष विमानाने भारतात आणले जाणार होते, पण ज्वालमुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणावर राख बाहेर आल्याने विमानांचे उड्डाण शक्यच होत नाही. वातावरण सुधारले तर राजनला गुरुवारी भारतात आणले जाण्याची शक्यता आहे.

आर्थर रोड तुरुंगातच कोठडी
मुंबई | राजनसाठी आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात पोलिस कोठडी तयार करण्यात आली आहे. त्याच्या सुरक्षेसाठी या भागात व्हिडिअो कॉन्फरन्सिंग, सीसी टीव्ही कॅमेरे असतील.राजनवरील आरोप अद्याप सिद्ध झाले नसल्याने तांत्रिकदृष्ट्या तो कच्चा कैदी असणार आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीसाठी आर्थर रोड तुरुंगातील १२ बी या भागाचा कारागृहाचा दर्जा रद्द करून हा विभाग राजनच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीत रूपांतरित करण्यात आला आहे.