आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमधून पाहा, जगभरात अशा प्रकारे सुरु आहे मुलींवर अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीमध्‍ये विवाहासाठी नोंदणी करणा-या 361 स्थलांतरितांचे वय 14 वर्षापेक्षा कमी आहे. मात्र विवाहासाठी येथे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असणे आवश्‍यक आहे. जर्मन प्रशासनानुसार, देशात राहणा-या अशा परदेशी नागरिकांची संख्‍या एक हजार 500 आहे. यातही बहुतेक महिला आहेत. जगातील सर्व विकसनशील देशांमधील मुलींची स्थिती अशीच आहे. अफगाणिस्तानमध्‍ये ही नुकतेच एका सहा वर्षांच्या मुलीचा विवाह 50 वर्षांच्या मौलवीशी लावून दिल्याचे वृत्त समोर आले होते. 70 कोटी महिलांचा झाला होता बालविवाहा...
युनिसेफच्या 2014 मधील आकड्यांनुसार गेल्या तीन दशकांमध्‍ये अशा प्रकरणात घट झाली आहे. मात्र जगभरात आताही 70 कोटी महिला अशा आहेत ज्यांचा बालविवाहा झाला होता. यात प्रत्येक तीनमधील एक म्हणजे 25 कोटी अशा आहेत ज्यांचा विवाह 15 पेक्षा कमी वयात झाला होता. याचा वाईट परिणाम त्यांच्या शरीराबरोबरच त्यांच्या होणा-या बाळांवर दिसतो. तसेच यांची लैंगिक शोषणाचे शिकार होण्‍याची शक्यताही इतर महिलांच्या तुलनेत जास्त असते.
शरीरावर वाईट परिणाम
कमी वयात विवाह करणा-या मुलींना भविष्‍यात मानसिक आजारांसारखे नैराश्‍य व तणावात जाण्‍याची शक्यता 41 टक्क्यांनी वाढते. प्रसुतीच्या वेळी 20 पेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या तुलनेत यांच्या मृत्यूची शक्यता पाचपटीने जास्त असतो. असे सर्व असताना आग्नेय आशिया, मध्‍यपूर्व देश आणि काही आफ्र‍िकन देशांमध्‍ये आजही बालविवाहा प्रचलित आहे. काही ठिकाणी विवाहासाठी बनवलेले कायदे-नियम धाब्यावर बसवून गपचूप विवाहा केला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा बालविवाहाची भेट म्हणून दिलेल्या मुलींचे फोटोज...