आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या मजल्यावरून बाळ पडले, दुकानदाराने अलगद झेलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा- दैव बलवत्तर असल्यावर काय हाेऊ शकते याचा प्रत्यय आणणारी घटना तुर्कीत घडली. एका इमारतीच्या बाल्कनीत खेळणारे दोन वर्षांचे बाळ घसरले आणि तिसऱ्या मजल्याच्या खिडकीच्या ग्रीलला चमत्कारिकपणे लटकले. खाली किराणा दुकानात काम करणाऱ्या मेहमत तापिकची दृष्टी खिडकीतून लटकणाऱ्या बाळावर गेली. त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी इमारतीच्या जवळ धाव घेतली.  खिडकीच्या ग्रीलमधून निसटल्याबरोबर तापिकने त्या बाळाला अलगदपणे झेलले. बाळ सुखरुप आहे.
बातम्या आणखी आहेत...