आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी एकटी ठेवलेली चिमुकली बाल्कनीच्या ग्रीलमध्ये अडकली, मोठी घटना टळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेची (चीन)- आईवडीलांनी दुर्लक्ष केले तर चिमुकल्यांवर कोणता प्रसंग उद्भवू शकतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. चीनमधील गुआन्झी प्रांतातील हेची या शहरात एक महिला आपल्या तीन वर्षांच्या मुलीला घरी सोडून बाहेर गेली. तिला बाहेर काही वेळ काम होते. या दरम्यान तिची मुलगी बाल्कनीच्या ग्रीलवर चढली. पण तिचा पाय घसरल्याने ती ग्रीलमध्ये अडकून पडली.
बाल्कनीच्या ग्रीलमध्ये अडकल्याने मुलगी मोठमोठ्याने रडू लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी गोळा झाले. यावेळी त्यांना मुलगी अडकलेली दिसून आली. काही शेजारी बाल्कनीत चढले. त्यांनी मुलीला आधार दिला. पण तिला ग्रीलमधून काढणे शक्य नव्हते. त्यानंतर अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चिमुकलीची यशस्वी सुटका केली.
या दरम्यान चिमुकलीची आई घरी परतली. घडलेली घटना ऐकल्यावर तिच्या डोळ्यांत पाणी तरळून आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी चिमुकलीच्या आईला चांगलेच खडसावले. चिमुकलीला सोडून घराबाहेर जात जाऊ नका, असा सल्ला दिला...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा.... घरी लहान मुले असतील तर आईवडीलांनी कोणती काळजी घ्यायला हवी....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...