आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच रुग्णालयात, एकाच वेळी जन्म आणि २६ वर्षांनंतर विवाहबंधनात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: दोन तासांच्या फरकाने जन्मलेले डेव्ह मॅकडरमोट आणि सोफी कोल्स .
लिसेस्टर - हा केवळ योगायोग आहे...एकाच रुग्णालयात दोन तासांच्या फरकाने जन्मलेले डेव्ह मॅकडरमोट आणि सोफी कोल्स विवाहबंधनात अडकणार आहेत. २६ वर्षांपूर्वी लिसेस्टरच्या रॉयल इन्फर्मरीमध्ये दोघांचा जन्म एकाच वाॅर्डमध्ये झाला होता. प्रसूती करणारी दाईदेखील एकच होती. त्यांच्या जन्माची माहितीदेखील एकाच वृत्तपत्रात सोबतच प्रकाशित झाली होती. एकाच शाळेत उभयतांचे शिक्षण झाले. सोळाव्या वर्षी सोबत जगण्याच्या आणाभाकादेखील त्यांनी घेतल्या. आता ते या वीकेंडला विवाह करणार आहेत. सोफी म्हणते, आम्ही एकाच दिवशी एकाच रुग्णालयात जन्माला आलो. हे ऐकायला थोडे वेगळे वाटते; परंतु त्याला केवळ योगायोग म्हणावे लागेल.
पुढे पाहा डेव्ह मॅकडरमोट आणि सोफी कोल्स चे छायाचित्रे...