आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Inside Isis Style Cage Protest Against Syrians President Bashar Al Assad

ISIS चिमुकल्यांना जिवंत जाळणार? पिंज-यात बंद निष्‍पाप जीवांचे PHOTOS जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: पिंज-यातील निष्‍पाप चिमुकले.)
डूमा/दमिश्क (सीरिया) - सोशल मीडियावर पिंज-यात बंद असलेल्या निष्‍पाप चिमुकल्यांची छायाचित्रे वेगाने शेअर झाली आहेत. दहशतवादी संघटना ISIS आता या चिमुकल्यांना जिवंत जाळून ठार मारणार असल्याचे सांगितले जात आहे. पण अखेर हे वृत्त फसवे असल्याचे समोर आले आहे. सीरियाच्या लष्करी कारवाईचा निषेध करण्यासाठी मुलांच्या पालकांनी त्यांना पिंजऱ्यात कोंडले आहे.
वस्तुस्थिती अशी, सिरियात राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्या लष्कराकडून नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. या हल्ल्यात आतापर्यंत १७ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शाळा, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. काही मुलांनी रविवारी त्याविरोधात निदर्शने केली. यासाठी त्यांच्या पालकांनी त्यांना एका भल्यामोठ्या पिंजऱ्यात कोंडले. यापूर्वी त्यांना जंपसुट घालण्यात आला.
इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी इराकच्या किरकुक शहरात बंद पिंज-यात कुर्दिश हल्लेखोरांना परेड करायला लावले होते. त्यांना अशाच रंगाचे नारंगी जंपसूट घातले होते, हे विशेष.

पुढे पाहा पिंजऱ्यात बंद चिमुकल्यांची छायाचित्रे.... असे केले चिमुकल्यांनी आंदोलन...