आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Children Take Education In Natural Nursery In Rome

निसर्गाच्या नर्सरीतून मुले घेतात शिक्षण, रोममध्ये 'नर्सरी फॉर फाॅरएव्हर' स्कूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोम(इटली) - रोम शहरात चार मित्रांनी एकत्र येऊन मुलांना निसर्गाचे सान्निध्य लाभावे म्हणून एक प्रयोग केला आहे. त्यांनी छोट्या मुलांसाठी 'नर्सरी फॉर फॉरएव्हर' स्कूल सुरू केले असून येथे वर्गखोल्यांऐवजी फार्महाऊस तयार करण्यात आले आहेत. ब्लॅकबोर्डऐवजी कुंड्यांचा वापर करण्यात आला असून येथे मुले भाजीची लागवड, वृक्षारोपण, जनावरांची देखभाल करण्याचे शिक्षण घेतात. या माध्यमातून ही मुले निसर्गाशी जोडले जातात. ही मुले उत्तम शेतकरी व्हावेत, हा यातील उद्देश आहे.

वास्तविक शहरी शेतीविषयाला नर्सरी अभ्यासक्रमाशी जोडण्यासाठी एडोराडो कॅपुजो डॉलसिएटा, गॅबरिले कॅपोबिनायको, डॉव्हिदे ट्रॉइयानी आणि जॉनाथन लॉजर हे चौघे नवी कल्पना घेऊन उतरले आहेत. यासाठी त्यांनी ऑट-ऑट नावाने एक पथक तयार केले आहे. इटलीमध्ये सध्या लोक शेतीपासून दूर जात आहेत. विशेषत: यात युवकांना तर अजिबात रस राहिलेला नाही. दुसरीकडे मुले फास्ट फूड आणि जंक फूडच्या नादी लागलेले आहेत.

मुलांच्या या सवयी बदलण्यासाठी या शाळेचा अभ्यासक्रम तीन मुख्य विषयांवर आधारित तयार करण्यात आला आहे. यात निसर्गाबद्दल माहिती, शेती करण्याची पद्धत आणि त्याचा अभ्यास कसा करावा, याची माहिती समाविष्ट आहे. शाळेच्या वर्गखोल्याही अगदी वेगळ्या आहेत. यात अनेक प्रकारच्या बागा तयार करण्यात आला असून मुलांना धान्योत्पादनासाठी पेरणी करणे, पीक कापणी जनावरांची देखभाल असे विषय शिकवले जातात. निराेगी जीवनशैली जगता यावी म्हणून शिक्षण दिले जाते. सौरऊर्जेबाबतही मुलांना सांगितले जाते. एडोराडो म्हणतात, शिक्षणासोबत निसर्गाचा आनंद मुले घेऊ शकतील अशी शाळा उघडण्याचा आम्ही विचार केला. अभ्यासक्रमही तसाच तयार केला. यासाठी वर्गखोलीऐवजी मोकळी जागा ठेवली. येथे जनावरेही आहेत. त्यामुळे या वातावरणात अभ्यास करताना मुलांनाही मजा वाटते. या नव्या कल्पनेबद्दल आमच्या पथकाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवकल्पनेचा पुरस्कारही मिळाला आहे.