आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Again Blocks India\'s Bid At UN To Ban JeM Chief Masood Azhar

UN:मास्टरमाइंड मसूदच्या बंदीला चीनचा विरोध, भारताला 14 देशांचा पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड व 'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्याचा भारताचा प्रयत्न एकदा पुन्हा अयशस्वी ठरला आहे.
मसूदच्या बंदीला चीनने विरोध केला आहे. संयुक्त राष्ट्र समितीकडे मसूदवर बंदी घालण्याची भारताने मागणी केली होती.

15 पैकी 14 देशांचा भारताला पाठिंबा...
- संयुक्त राष्ट्र समिती मसूद अझहरच्या बंदीबाबत आपला निर्णय देणार होती. समितीतील 15 पैकी 14 देशांचा भारताल पाठिंबा दर्शवला आहे.
- अमेरिका, यूके व फ्रान्ससारख्या देशांचा भारताला पाठिंबा आहे. केवळ एकट्या चीनने विरोध केल्यामुळे समितीने हा निर्णय राखून ठेवला आहे.
- आश्वयकारक गोष्ट म्हणजे चीनने विरोध करण्याचे कारणही स्पष्ट केलेले नाही. चीनने पाकिस्तानमुळे अझहरच्या बंदीला विरोध केल्याची माहिती आहे.
- संयुक्त समितीच्या बैठकीपूर्वी चीनने पाकिस्तानसोबत चर्चा केल्याचे भारत सरकारने म्हटले आहे.
- पाकिस्तान या समितीचा सदस्य नाही. चीन या समितीचा सदस्य असून पाकच्या सांगण्यावरून चीनने हा विरोध केला आहे.
-संयुक्त समितीने भारताला सांगितले की, अझहरवर बंदी घातल्यास भारतासह दक्षिण आशियातील इतर देशांवर दहशतवादी हल्ल्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- 'आम्ही हा मुद्दा भविष्यातही लावून धरणार आहे.मसूदच्या बंदीसाठी आमचे प्रयत्न सुरूच राहातील.', असे भारताचे प्रतिनिधी सैय्यद अकबरुद्दीन यांनी यूएन समितीसमोर सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, भारताने17 वर्षांपूर्वी मसूद अझहरला कंधारमध्ये सोडले होते....