आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन नेपाळमध्ये बनवणार रेल्वेमार्ग, आर्थिक नाकेबंदीवर काढला पर्याय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भारतीय मार्गांवर सुरू झालेल्या आर्थिक नाकेबंदीपासून धडा घेत नेपाळने चीनशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे. नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी नेपाळमधून तिबेटमार्गे चीनपर्यंत रेल्वेमार्ग बनवण्याची केलेली मागणी चीनने मान्य केली आहे. अोली सध्या चीनच्या दौऱ्यावर असून त्यांनी नेपाळ व चीनदरम्यानचे संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने १० करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
ओली रविवारी बीजिंगमध्ये पोहोचले आणि सोमवारी त्यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांची भेट घेतली. त्यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रेल्वेमार्गाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
चीन-नेपाळदरम्यान महत्त्वाचे करार
> नेपाळमध्ये रेल्वेमार्ग बनवण्याच्या उद्देशाने चिनी कंपन्या पडताळणी करणार. चिनी सरकार त्यांना सुविधा पुरवेल.
> तिबेटच्या शिगात्सेपासून नेपाळच्या ग्यिरोंगपर्यंत रेल्वेमार्ग टाकण्याची चीनची आधीपासूनच योजना आहे.
> ३२ हजार घरांत सौरऊर्जा पुरवठ्यासाठी सौरऊर्जा प्रकल्पाचा करार.
> पोखरामध्ये विमानतळ बनवण्यासाठी सहज अटींवर कर्ज.
> हिल्सामध्ये पूल बनवणार.
> नेपाळमध्ये तेलवायू शोधण्यासाठी चीन मदत करणार. नेपाळला भारतावर अवलंबून राहायचे नाही म्हणून ते चीनकडून ३३ टक्के आयात करते.
बातम्या आणखी आहेत...