आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक थेट संवाद गरजेचा, मसूद प्रकरणात चीनची भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- मसूद अजहरविषयी भारत आणि पाकिस्तानदरम्यान थेट संवादाची गरज असल्याची भूमिका चीनने घेतली आहे. हा विषय गंभीर चर्चेचा असून जैश मोहंमदच्या प्रमुखाला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर केली होती. मात्र याला चीननेच नकाराधिकार वापरून गतिरोध निर्माण केला होता. यानंतर चीनने पुन्हा या विषयावर भाष्य केले आहे. उभय देशांच्या संवादात मसूद मुद्यावरून नकारात्मकता वाढत असल्याचे भारताने म्हटले होते.

लिखित स्वरूपात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयीन यांनी यासंबंधीची चीनची भूमिका स्पष्ट केली. मसूद अजहरसंबंधी सर्व गटांना चर्चेसाठी एका पीठावर आणण्याचा प्रयत्न चीन करेल असे माध्यमांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. सुरक्षा परिषदेतील चीनच्या भूमिकेमुळे भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. जैशवर आंतरराष्ट्रीय बंदी असताना मसूदवर का नसावी, असा प्रश्न भारताने विचारला होता.

चीनची भूमिका व्यूहात्मक
भारताने नाराजी व्यक्त केल्यानंतर चीनच्या भूमिकेत बदल झालाय का, या प्रश्नाचे संदिग्ध उत्तर हुआ यांच्याकडून मिळाले. संयुक्त राष्ट्रांच्या शिष्टाचारानुसार परिषदेत उभय देशांच्या थेट संवादाची गरज आहे.

भारताने वेळोवेळी केला पाठपुरावा
मसूद अजहरविषयी चीनच्या भूमिकेचा भारताने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी १८ एप्रिल रोजी मॉस्कोत झालेल्या त्रिपक्षीय बैठकीदरम्यान चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशीही अजहरविषयी स्वतंत्र चर्चा केली होती. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याच दिवशी बीजिंगमध्ये त्यांच्या समपदस्थांसमोर या मुद्दा उपस्थित केला होता. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनीही वेळोवेळी चीनच्या भूमिकेविषयी विचारणा केली आहे.