आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखवीच्या मुद्द्यावर चीनची पाकला साथ, संपूर्ण पुरावे न दिल्याचा युनोत कांगावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - चीनने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला जोरदार झटका दिला आहे. भारताने पुरेसे पुरावे दिले नसल्याचा कांगावा करून पाकला साथ देत चीनने संयुक्त राष्ट्रांत मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवी याच्या विरोधातील कारवाईचा प्रस्ताव रोखला आहे. यामुळे लखवीवर कारवाई न करण्यासाठी अडलेल्या पाकला नैतिक बळ मिळाले असून पाकविरोधात कारवाई थांबली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या सर्वोच्च नेतृत्वाशी या मुद्द्यावर चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, भारताचा प्रस्ताव राेखल्यानंतर देशाने चीनकडे आपल्या चिंता व आक्षेप मांडले आहेत.

संयुक्त राष्ट्रे, सुरक्षा परिषदेचे चार स्थायी सदस्य राष्ट्रांची लखवीविरुद्ध कारवाईत भारताला साथ आहे. भारताच्या आग्रहावरून सोमवारी संयुक्त राष्ट्र प्रतिबंध समितीची बैठक झाली. भारताचे राजदूत अशोक मुखर्जी यांनी समिती अध्यक्ष जिम मॅकले यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, पाक कोर्टाकडून लखवीची सुटका म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव १२६७ चे उल्लंघन आहे. मॅकलेंनी भारताला पाठिंबा देत लवकरच बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले होते.