आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनने अडवले \'ब्रह्मपुत्रा\'च्या उपनदीचे पाणी, भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग/नवी दिल्ली- पाकिस्ताननेचिथावल्याने चीनी ड्रगनने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. चीनने तिबेटमध्ये 'ब्रह्मपुत्र' नदीची उपनदी शियाबुकुचे पाणी अडवले आहे. चीनचे येथे मोठा हाइड्रो प्रोजेक्ट उभारण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी चीनने नदीवर भलामोठा बंधारा बांधण्याचे काम सुरु आहे.

चीनच्या या करघोडीमुळेे भारतासह अनेक देशांना मिळणार्‍या ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर 'पाणी' फिरणार आहे. बंधार्‍यामुळे ब्रह्मपुत्रेच्या प्रवाहावरही परिणाम होणार असून आहे.

यातून चीनला नेमके काय दाखवायचे आहे....
- 'शिन्हुआ' न्यूज एजन्सीने शनिवारी प्रोजेक्टचे अॅडमिनिस्ट्रेशन ब्यूरोचे प्रमुख झांग युनबाओ यांच्या हवाल्याने हा दावा केला आहे.
- तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीला यारलुंग जांगबू संबोधले जाते. चीनने ब्रह्मपुत्रेची उपनदी शियाबुकुचे पाणी अडवले आहे.
- या नदीवर चीनचा 'लालहो' नामक एका मोठा हायड्रो प्रोजेक्टचे काम सुरु आहे. चीनने आतापर्यंत या प्रोजेक्टवर 740 मिलियन डॉलर (4.95 बिलियन युआन) खर्च केले आहेत.

चीन-पाकिस्तानचे साटेलोटे!
- भारतीय लष्कराने पाकच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राइक करून उरी हल्ल्याचा बदला घेतला आहे. 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामुळे पाकिस्तान चांगला संतापला आहे. पाकिस्तानेे चीनच्या मदतीने शियाबुकु नदीचे पाणी अडवल्याची माहिती मिळाली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारत-पाकमध्ये झालेल्या ऐतिहासिक सिंधु पाणी वाटप करारासंंदर्भात रिव्ह्यू केला होता.
- त्यानंतर पाकिस्तानेे ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी अडवण्याची धमकी दिली होती.
- चीन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे.

तिबेटमधील जाइगेजमध्ये सुरु आहे चीनच्या प्रोजेक्टचे काम...
- तिबेटमधील जायगेजमध्ये चीनच्या या प्रोजेक्टचे काम सुरु आहे.
- या भागाला शिगेट्स असेही म्हटले जाते. सिक्किमपासून हा भाग जवळ आहे.
- जाइगेजमधून ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते.
- 'शिन्हुआ'च्या रिपोर्टनुसार, चीनने या प्रोजेक्टचे काम जून 2014 मध्ये सुरु केले होते. 2019 पर्यंत हा प्रोजेेक्ट पूर्ण होणे अपेेक्षित आहे.

पुुढील स्लाइडवर वाचा, एक नदी तीन नावे...
बातम्या आणखी आहेत...