आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीआेकेतील प्रकल्पाचा काश्मीर प्रश्नाशी थेट संबंध नाही, चीनचे स्‍पष्टिकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - व्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या आर्थिक प्रकल्पाचा काश्मीर प्रश्नाशी थेट संबंध नाही, असे चीनने स्पष्ट केले आहे. चीन-पाकिस्तान यांच्यातील इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (सीपीईसी) सर्वांनाच फायदा होईल, असा दावाही चीनने केला आहे.
 
भारताने व्यक्त केलेल्या चिंतेवर चीनने भूमिका मांडताना हा दावा केला आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील ‘एक प्रदेश, एक मार्ग’ धोरणाचे भारताने स्वागत केले आहे. खरे तर या प्रकल्पात आम्ही भारताचे स्वागत करतो. भारताने त्यात सहभागी झाल्यास एक प्रदेश, एक मार्ग ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल, असे चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले. आेबीआेआर असे या अब्जावधी डॉलर्सच्या सिल्क रोड प्रकल्पाचे नाव आहे.

शेजारी देशांच्या विकासासाठी चीनने आपले योगदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने सीपीईसीकडे पाहिले पाहिजे. बांगलादेश, चीन, भारत, म्यानमार यांचा समावेश असलेल्या बीसीआयएम प्रकल्पात भारताचा सहभाग आहे. ही अतिशय सकारात्मक बाब असल्याचे चीनने यानिमित्ताने मान्य केले. त्याशिवाय २८ देशांचा समावेश असलेल्या अन्य एका प्रकल्पासाठीदेखील आम्ही प्रयत्नशील असल्याचे वँग यांनी सांगितले.
 
पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य
पाकिस्तान-चीनयांच्यातील इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) व्याप्त काश्मीरमधून जात आहे. परंतु हा आर्थिक प्रकल्प आहे. आर्थिक असल्यामुळे त्याचा संबंध काश्मीर मुद्द्याशी जोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रकल्पाच्या माध्यमातून परस्परांतील आर्थिक सहकार्य वाढीवर भर दिला जाणार आहे. त्याचा थेट राजकीय किंवा सीमा प्रश्नाशी संबंध नाही, असा दावा वँग यांनी केला. सीपीईसीवर चीनकडून भारताच्या चिंतेबद्दल पहिल्यांदाच जाहीरपणे भूमिका मांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
संपर्क वाढवण्याचे उद्दिष्ट : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सिल्क रोडच्या माध्यमातून शेजारच्या देशांसोबत थेट संपर्क वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे रणनीतीच्या पातळीवर चीनचा जगभरात दबदबा वाढावा, असा चीनचा विचार आहे. त्यासाठी आेबीआेआर प्रकल्पाचा घाट घालण्यात आला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...