आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांत मोठ्या वादळाने हादरले होते चीन; 11 लाख लोक झाले होते विस्थापित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वादळामुळे चीनच्‍या समुद्र किना-यावर अशा उंचच उंच लाटा उसळल्‍या होत्‍या. - Divya Marathi
वादळामुळे चीनच्‍या समुद्र किना-यावर अशा उंचच उंच लाटा उसळल्‍या होत्‍या.
शंघाई (चीन) – चीनमधील झेजियांग आणि झियांगसू प्रांतात गेल्‍यावर्षी 12 जुलै रोजी चान-होम नावाचे प्रचंड मोठे वादळ आले होते. त्‍यामुळे तब्‍बल 11 लाख व्‍यक्‍तींनी आपले घर सोडून सुरक्षित स्‍थळाकडे धाव घेतली; तर विमान, रेल्‍वे आणि दळण-वळण, फोन अशा सर्वच सुविधा ठप्‍प झाल्‍या होत्‍या. 1949 नंतर चीनमध्‍ये आलेले हे सर्वात मोठे वादळ ठरले होते. चीनमध्‍ये कहर घातलेल्‍या या वादळाच्‍या आठवणी काही फोटोंमधून पाहूया.
झेजियांग प्रांताच्‍या प्रशासनाने सांगितले होते, वादळामुळे 410 मिलियन डॉलरचे ( जवळपास 2590 कोटी रुपये) नुकसान झाले. हे वादळ शंघाईच्‍या दक्षिण समुद्र किना-यावर भिडले. यावेळी हवेचा वेग 160 किलोमीटर प्रति तास होता.
वीजपुरवठा बंद, ट्रांसपोर्ट ठप्‍प
जेझियांग प्रांतातील बहुतांश शहरात आणि गावांमध्‍ये वादळामुळे वीज पुरवठा बंद झाला होता, तर दळण-वळण ठप्‍प झाले होते. 100 पेक्षा अधिक ट्रेन अापल्‍या जाग्‍यावर उभ्‍या होत्‍या. मच्‍छीमारांच्‍या 50 हजार होड्या परत बोलवाल्‍यात आल्‍या होत्‍या. शंघाईच्‍या पुडोंग अंतरराष्ट्रीय विमानतळावरून 500 पेक्षा जास्‍त विमान उड्डाण रद्द करण्‍यात आले होते. वादळामुळे जापानच्‍या ओकिनावा द्वीप श्रृंखला आणि तायवानही प्रभावित झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवरील फोटोंमध्‍ये पाहा, वादळाने असे घातले होते थैमान..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...