आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने हिंदी महासागरात शोधले मौल्यवान धातू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या पहिल्या समुद्राच्या तळाची जाण्यास सक्षम मानववाहू पाणबुडीने वायव्य हिंदी महासागरातून मौल्यवान धातू शोधून काढले आहेत. जियाआेलाँग पाणबुडीद्वारे येथून ४.२ किलो सल्फाइड, १८.७ किलो बेसाल्टचे नमुने आणले आहेत. 
 
३,११७ मीटर खोलीतून हे जमा करण्यात आल्याचे फिल्ड कमांडर यू होंगयून यांनी सांगितले. जियाआेलाँगची ही २०१७ मधील पहिली मोहीम होती. चीनच्या ३८ व्या महासागर संशोधनामध्ये जियाआेलाँगची निर्मिती झाली. १२४ दिवस ही पाणबुडी सागराच्या उदरात सफर करत होती. दक्षिण चीन समुद्र, याप ट्रेंच येथेही हीचा संचार झाला असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. ७,०६२ मीटर खोलीपर्यंत जाण्याची हिची क्षमता आहे.  

इंटरनॅशनल सीबेड अॅथाॅरिटीशी चीनचा करार 
पाणबुडी निर्माणात चीनने मोठी झेप घेतली असून इंटरनॅशनल सीबेड  (आयएसए) हिंदी महासागरात संशोधनाचा करार चीनने केला होता. पॉलिमेटॅलिक गंधक आणि त्याची संयुगे शोधण्यासाठी हा करार झाल्याचे चीनने म्हटले आहे. आत्तापर्यंत हिंदी महासागरात याचा साठा असलेले दोन क्षेत्रे सापडल्याचा दावा चीनने केला आहे. चायना आेशन मिनरल रिसोर्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट असोसिएशनला नैऋत्य हिंदी महासागराच्या १०,००० चौरस किलोमीटर परिसरात संशोधनाची मक्तेदारी देण्यात आली आहे. आफ्रिकेच्या किनारपट्टीजवळील हा प्रदेश आहे.
 
बातम्या आणखी आहेत...