आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये शाळेबाहेर शक्तिशाली बॉम्बस्फोट, 7 विद्यार्थी ठार, 59 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- चीनमधील जिआंगसू प्रांतात काल (गुरुवार) रात्री एका शाळेबाहेर शक्तिशाली ब्लास्ट झाला. त्यात सात जणांचा मृत्यू झाला असून 59 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लहान चिमुरड्यांची संख्या सर्वाधिक आहे.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाळा सुटण्याच्या 10 मिनिटांआधी हा ब्लास्ट झाला. विद्यार्थ्यांचे पालक स्कूलबाहेर आले होते. त्या महिलांची संख्या सर्वाधिक होती.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अचानक मोठा ब्लास्ट झाला. त्यात सात जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. त्यात विद्यार्थी आणि महिलांचा समावेश आहे.

न्यूज एजन्सीनुसार, 40 जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

अनेक विद्यार्थी अत्यावस्थ...
- फेंगशियान काउंटीच्या पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, ब्‍लास्‍ट कसा झाला हे  अद्याप स्पष्ट झालेले नाही. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. बचाव कार्य सुरु असून अनेक विद्यार्थी अत्यावस्थेत आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
बातम्या आणखी आहेत...