आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन कंपन्यांची गुंतवणूक फायदेशीर; चीनची प्रसारमाध्यमे देताहेत गुंतवणुकीचा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनचे उत्पादन न वापरण्यासंदर्भात देशात जनअभियान सुरू असताना चीनमधील सरकारी माध्यमांनी मात्र कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला आहे. ग्लोबल टाइम्समध्ये छापील लेखाप्रमाणे चीनच्या कंपन्या भारतात उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करून मोठा नफा कमावू शकतात. कंपन्या याचा फायदा घेऊ शकल्या नाहीत तर ही मोठी चूक ठरणार असल्याचेही यात म्हटले आहे.

लेखात सांगितल्याप्रमाणे, भारतात उत्पादनाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु यात चीनचे काही योगदान नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास भारताचा उत्पादन विकास रोखण्यासाठी आपण सक्षम नाहीत. हा लेख नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्ट्रॅटेजीचे संशोधक जी चेंग यांनी लिहिला आहे. चेंग यांच्या मते, भारतीय बाजारात चीनने गुंतवणूक केल्यास नफा चांगला होऊ शकतो. नुकत्याच गोवा येथे झालेल्या ब्रिक्स संमेलनानंतर भारत पुन्हा एकदा चमकता तारा म्हणून समोर आला आहे. २०१४ मध्ये सुधारणेच्या दृष्टीने पावले उचलल्याचे परिणाम आता दिसत आहेत. आर्थिक विकास दर तेजीने वाढत आहे. याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धती बदलली आहे, भ्रष्टाचार कमी झाला आहे, अनेक वर्षांपासूनच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चेंग यांच्या मते, भारताचा जीडीपी वाढीचा दर आकडे वाढून सांगण्यात आल्याची शक्यता आहे. परंतु कच्च्या तेलाचे भाव पडल्यामुळेही याचा परिणाम होऊ शकतो. सरकार पातळीवर गुंतवणुकीचे वातावरण निर्माण केले जात आहे. सार्वजनिक बँका सोडून जवळपास सर्वच क्षेत्रांत परदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्के केली आहे. ऑटोमॅटिक अप्रूव्हलची मर्यादाही ५० हजार कोटी करण्यात आली आहे.

...तर भारतीय अर्थव्यवस्थेत चीनचे प्रस्थ वाढेल
भारतीय अर्थव्यवस्था तेजीने वाढत असताना भारतात उत्पादन क्षेत्रात उतरावे किंवा नाही यावरून चीनमध्ये विचार केला जात आहे. स्वस्त आणि मध्यम स्तरावरील वस्तू बनवताना भारतीय कंपन्या चीनला मागे टाकू शकतात, असे काही जणांचे म्हणणे आहे. चीनच्या कंपन्यांना अमेरिका, जपान आणि युरोपच्या कंपन्यांसोबत महाग वस्तू बनवण्यासाठी स्पर्धा करावी लागेल, असेही काहींना वाटते. महाग वस्तूंबाबत आपण युरोपीय कंपन्यांना मागे टाकू शकत नाही आणि स्वस्त वस्तूंमध्ये भारतीय कंपन्यांकडून आव्हान मिळेल, अशी भीतीही वाटत आहे. परंतु लेखकाच्या मते गुंतवणुकीतून भारतीय अर्थव्यवस्थेत चीनचे प्रस्थ वाढेल.
बातम्या आणखी आहेत...