आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे लष्करी बजेट भारताच्या तीनपट जास्त, चीनकडून सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणारा देश पाकिस्तान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - चीन गेल्या काही दशकांपासून आपल्या संरक्षण अर्थसंकल्पात सातत्याने वाढ करत आला आहे. आता हा अर्थसंकल्प भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा तीनपट अधिक आहे. त्यामुळे हा देश आता अमेरिकेच्या हितसंबंधांना धोकादायक ठरू लागला आहे. अमेरिकेच्या पेंटागॉनच्या वार्षिक अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

गेल्या वर्षी चीनची अधिकृत संरक्षणविषयक तरतूद १३६.३ अब्ज डॉलरची होती. भारताची संरक्षण तरतूद ३८.२ अब्ज डॉलर होती. चीनने आधुनिक संरक्षण उद्योग सुरू केला आहे. पाकिस्तान त्याचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. पाकिस्तान चीनकडून पारंपरिक शस्त्रे आयात करणारे राष्ट्र अाहे. २००९ ते २०१३ दरम्यान चीनने जगभरात १४ अब्ज डॉलरचे शस्त्रविषयक करार केले. चीन पाकिस्तानला शस्त्रे आणि संरक्षण उपकरण देत आला आहे. त्यात हेलिकॉप्टरसह एफ २२ पी फ्रिगेट्स, के-८ जेट ट्रेनर, लढाऊ विमानांचा समावेश आहे.

विमानांची निर्मिती
पाकिस्तानने २०१४ मध्ये चीनच्या मदतीने जेएफ-१७ विमानांची निर्मिती सुरू केली आहे. लवकरच त्याची सुधारित आवृत्तीदेखील तयार केली जाणार आहे. अाशियातील काही देशांनादेखील चीनकडून शस्त्र पुरवठा केला जाणार आहे. चीन कमी दरात शस्त्रे विकत असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. त्या वर्षी रशियाचे संरक्षण बजेट ७.६३ कोटी डॉलरचे होते आणि जपानचे ४.७६ कोटी डॉलर. दक्षिण कोरियाचे गेल्या वर्षी ३३.४ अब्ज डॉलर एवढी संरक्षण तरतूद होती आणि तैवानची १०.३ अब्ज डॉलर तरतूद होती.
बातम्या आणखी आहेत...