आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने तयार केले जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनच्या तंत्रज्ञांनी जगातील पहिले इलेक्ट्रिक विमान तयार केल्याचा दावा केला आहे. विजेवर चालणाऱ्या या विमानाचे नाव बीएक्स-१ इ असे आहे. शेनयांग एरोस्पेस विद्यापीठ आणि लिआेनिंग जनरल एव्हिएशन अकॅडमी यांच्या संयुक्त प्रयत्नातून त्याचे डिझाइन तयार करण्यात आले आहे.

‘बीएक्स-१ इ’ ची दोन विमाने लिऑनिंग रुक्सियांग जनरल एव्हिएशन कंपनी लिमिटेडला गुरुवारीच सोपवण्यात आली आहेत. त्याची किंमत सुमारे १ लाख ६३ हजार दशलक्ष डॉलर्स एवढी आहे.

>१६० किमी ताशी वेग
>१४.५ मीटर पंखे
>२३० किलोग्रॅम क्षमता
>३,००० मीटर उंचीवर उडण्यास सक्षम

कमी वेळेत चार्जिंग
विमानाचे चार्जिंग केवळ दोन तासांत होऊ शकते.

कोठे उपयोग होणार ?
वैमानिकांचे प्रशिक्षण, पर्यटन, हवामान विभाग, बचावकार्य.
बातम्या आणखी आहेत...