आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाकडून शस्त्रे खरेदी करून हिमालयात भारताला घेरण्याचे चीनचे मनसुबे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनचे आपले लष्करी बळ वाढवण्याचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. एवढेच नव्हे तर भारताला हिमालयात घेरण्यासाठी चीन रशियाकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार आहे. अगोदरपासूनच बलाढ्य असलेल्या चीनचे हवाई दल हा सौदा पूर्ण झाल्यानंतर तिबेटसारख्या उंचावरील प्रदेशात आणखी मजबूत होईल.

रशियाच्या मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार रशियाकडून चीनला नवीन पिढीचे एस-४०० अँटी एअरक्राफ्ट शस्त्र प्रणाली देखील मिळणार आहे. त्यामुळे चीन कोणतेही हवाई लक्ष्य भेदू शकणार आहे. क्रूझ किंवा टॅक्टिकल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागू शकतो. त्याचा वेग प्रती सेकंद ४.८ किलो मीटर असा असेल. ‘चायना डेली’च्या म्हणण्यानुसार ४० एन ६ क्षेपणास्त्र ४०० किलो मीटरपर्यंत लक्ष्य भेदणे शक्य होणार आहे. रशियाची सरकारी शस्त्र विक्रेता कंपनी रोसोबोरोनेक्सपोर्टचे कार्यकारी प्रमुख अनाटोली इसाइकिन म्हणाले, एस-४०० खरेदीसाठी करार झाला आहे. त्याचा तपशील देता येणार नाही. परंतु चीन अत्याधुनिक रशियन हवाई संरक्षण प्रणालीचा पहिला खरेदीदार बनला आहे.

रशियाला आर्थिक मदत
युक्रेनचा वाद सुरू असतानाच हा सौदा होऊ घातला आहे. वास्तविक पश्चिमेकडील देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. या सौद्याच्या बदल्यात रशियाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात दोन्ही देशांमध्ये ४०० अब्ज डॉलरचा गॅस सौदा झाला होता. त्या अंतर्गत रशिया ३० वर्षांपर्यंत दरवर्षी ३८ अब्ज घनमीटर नैसर्गिक गॅसचा पुरवठा करणार आहे. या वर्षी आणखी एक सौदा होईल. त्यानुसार चीनला पश्चिमेकडील सायबेरियाकडून गॅसचा पुरवठा होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि रशियाने पहिली संयुक्त लष्करी कवायत करण्याला संमती दर्शवली आहे. मॉस्कोमध्ये पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा अासिफ आणि रशियन संरक्षणमंत्री सेर्गेई शोग यांच्यात यासंदर्भात करार झाला. संरक्षण आणि लष्करी प्रशिक्षणात सहकार्य करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे.

इराणशीही करार
निर्बंधाला न जुमानता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अलीकडेच इराणसोबत जमिनीवरून हवेत आणि क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणालीचा करार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे ८० कोटी डॉलर्सचा हा करार वर्षाखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. वर्षाअखेरीस इराणला ही प्रणाली पुरवली जाणार आहे. अगोदरच इराण आण्विक कार्यक्रमावरून आंतरराष्ट्रीय समुदायाच्या टीकेचा धनी बनला आहे. त्यात हा करार पूर्ण होणार असल्यामुळे अमेरिकेने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे इराणने युरोपमध्ये नाटो देशांना रोखण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी रशिया, चीन आणि भारताला सहकार्य करण्याचीही तयारी दाखवली. त्यावरून राजकीय तणाव निर्माण झाला.

चीन या क्षेत्रात कमकुवत
>लांब पल्ल्याची हल्ल्याची क्षमता
>उंच ठिकाणी सुरक्षा >बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव.

भारत-तिबेट सीमा
चिनी लष्कर तिबेटच्या उंच डोंगरी भागात भारत-चीन सीमेवर प्रत्यक्ष सीमा रेषेवर तैनात आहे.

प्रणालीची क्षमता
{एकाच वेळी ३६ लक्ष्य वेध घेण्यात सक्षम {तीन पद्धतीची अण्वस्त्रे डागणे शक्य. { ४०० किलोमीटरच्या क्षेत्रात हल्ला