आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत महत्त्वाचा शेजारी, संबंध वाढवणार: अजहर प्रकरणी खोडा घातल्यानंतर चीनची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनने नेबरहूड डिप्लोमसी अंतर्गत शेजारी देशांबरोबर संबंध पुढे नेण्यासाठी योजना आखली आहे. (फाइल) - Divya Marathi
चीनने नेबरहूड डिप्लोमसी अंतर्गत शेजारी देशांबरोबर संबंध पुढे नेण्यासाठी योजना आखली आहे. (फाइल)
बीजिंग - मसूद अझहरला यूएन (युनायटेट नेशन्स) द्वारे जागतिक दहशतवादी जाहीर करण्यात खोडा घालण्याच्या दुसऱ्याच दिवशी चीनने भारताशी असलेल्या संबंधांबाबत भूमिका स्पष्ट केली. चीनने शुक्रवारी म्हटले, पाकिस्तान सपोर्टेड जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अझहरच्या मुद्द्यावरून तणाव आहे. पण तरीही द्विपक्षीय संबंधांमध्ये सुधारणा करत एकत्रित काम करायला तयार असल्याचे चीनने म्हटले. चीनचे असिस्टंट फॉरेन मिनिस्टर चेन शियाडॉन्ग यांनी मीडियाशी बोलताना याबाबत वक्तव्य केले. ते असेही म्हणाले की, भारताबरोबरच्या संबंधांना चीन खूप महत्त्व देते. भारत आमचा प्रमुख शेजारी आहे. 

जिनपिंग यांची नेबरहूड डिप्लोमसी...
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार चेन शियाडॉन्ग म्हणाले, चीनने नव्या युगात आपल्या वैशिष्ट्यांसह नेबरहुड डिप्लोमसी अंतर्गत शेजारी देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी योजना आखली आहे. त्याची कल्पना कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CPC) च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्रेसिडेंट शी जिनपिंग यांनी मांडली. 
- चीनने पठानकोट दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या मुद्द्यावर गुरुवारी चौथ्यांदा भारत, अमेरिका आणि इतर देशांना धक्का दिला. बंदी लादणाऱ्या कमिटी मेंबर्सची यावर सहमती होत नसल्याचे म्हणत चीनने याप्रकऱणी खोडा घातला आहे. 

दुहेरी भूमिकेमुळे कमकुवत होईल दहशतवादाविरोधातील लढाई : भारत
- अझहरबाबतच्या चीनच्या भूमिकेवर भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, काही ठरावीक उद्देशांसाठी दहशतवादाला पाठिंबा देणे योग्य नाही. ते दोन्ही देशांसाठी नुकसानकारक आहे. 
- एका दहशतवाद्यासाठी एक देश आंतरराष्ट्रीय निर्णयात अडथळा आणत आहे. हे समजल्यानंतर आम्ही पुन्हा निराश झालो. या दुहेरी भूमिकेमुळे दहशतवादाविरोधातील लढाई कमकुवत होईल. 
 
 
बातम्या आणखी आहेत...