आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला साक्षात्कार म्हणे- मसूद दहशतवादी नाही, भारताकडून नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्तराष्ट्र- पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जैश-ए-मोहंमदचा म्होरक्या मसूद अजहर संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट होऊ शकलेला नाही. चीनने पाकिस्तानच्या कट्टर समर्थकाची भूमिका घेत तो दहशतवादी नाही. त्यामुळे त्याच्यावर निर्बंध घालता येऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
चीनच्या भूमिकेवर भारताने तीव्र नाराजी जाहीर केली. त्या अगोदर चीनने भारतीय प्रस्तावावर आक्षेप घेतला होता. चीनने व्हेटोचा अधिकार वापरला होता.संयुक्त राष्ट्रातील चीनचे कायमस्वरूपी राजदूत लियूू जिएयी म्हणाले, कोणत्याही व्यक्तीला निर्बंधाच्या यादीत टाकण्यापूर्वी त्याच्यावर सर्व नियमांचा अभ्यास केला जाणे महत्त्वाचे आहे. तांत्रिकदृष्ट्या मसूद अजहर दहशतवादी असल्याचे सिद्ध होत नाही. २००८ मध्येही चीनने पाकची बाजू लावून धरली होती.