आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसूदला दहशतवादी घोषित करून भारताला राजकीय फायदा मिळू देणार नाही : चीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोदी आणि शी जिनपिंग। (फाइल) - Divya Marathi
मोदी आणि शी जिनपिंग। (फाइल)
बीजिंग - यूएनमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर याच्या बॅनला पाठिंबा न देण्याची भूमिका चीनने घेतली आहे. एकवेळ न्यूक्लियर्स सप्लायर्स ग्रूप म्हणजे एनएसजीमधील भारताच्या प्रवेशाबाबत चर्चा करू पण मसूदच्या बॅनला पाठिंबा देणार नाही. काउंटर टेररिझमच्या नावाखाली कोणाला राजकीय फायदा उचलू देणार नाही असे चीनने म्हटले आहे. चीनचे प्रेसिडेंट शी जिनपिंग BRICS परिषदेसाठी या आठवड्यात भारतात येत आहेत.

आणखी काय म्हटले चीनने..
- चीनचे व्हाइस फॉरेन मिनिस्टर ली बाडोंग सोमवारी म्हणाले, दहशतवादाच्या नावाखाली कोणत्याही देशाला राजकीय फायदा उचलू देणार नाही.
- चीनच्या या वक्तव्याने दहशतवादी मौलाना मसूद अझहर याला यूएनच्या 15 सदस्यांच्या सेक्युरिटी काऊन्सिलमध्ये दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. काऊन्सिलचे 14 मेंबर या कॅम्पेनमध्ये भारताच्या पाठिशी आहेत.

एनसीजीबाबत काय म्हटले..
- बाडोंग म्हणाले, भारताच्या एनएसजी प्रवेशाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला सर्वकाही प्रक्रियेनुसार हवे आहे. एनएसजीच्या कायद्यांच्यानुसार यावर चर्चा व्हायला हवी.
- भारताने कोणत्याही देशाचे नाव न घेता एक देश एनएसजीचे सदस्यत्व भारताला मिळण्यात अडचणी निर्माण करत असल्याचे म्हटले होते.
- गेल्या काही दिवसांत भारत आणि चीनमध्ये या मुद्यावर अनेक बैठका झाल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...