आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Test Longest Range Missile DF 41 It Can Reach Anywhere In World

शक्तिशाली मिसाईलची चीनकडून चाचणी, 30 मिनिटांत करु शकते अमेरिकेवर हल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनने जगातील सर्वात शक्तीशाली आणि लांबपल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. Dongfeng-41 नामक हे क्षेपणास्त्र अवघ्या अर्ध्यातासात 14,000 किलोमीटर पर्यंत मार करु शकते. एकाच वेळी ते 10 न्यूक्लियल वॉरहेड्स वाहून नेऊ शकते. क्षेपणास्त्राच्या चाचणीने दक्षिण चीन आणि अमेरिकेत सुरु असलेला सागरी सीमाप्रश्न आणखी वाढू शकतो. पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांनी या 'इंटरकॉन्टिनेंटल वेपन'च्या चाचणीवर नाराजी जाहीर केली आहे.
30 मिनिटात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मारा करण्याची क्षमता
- क्षेपणास्त्राची रेंज एवढी मोठी आहे, की यूरोपपासून अमेरिकेच्या कोणत्याही शहराला लक्ष्य केले जाऊ शकते.
- हे क्षेपणास्त्र 30 मिनिटात 14,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.
- पेंटागॉनच्या सूत्रांच्या माहितीनुसा, 'वॉशिंग्टन फ्री बीकन' वेबसाइटच्या हवाल्याने सांगितले आहे, की अमेरिकन सॅटेलाइट्स आणि रिजनल सेंसर्सने क्षेपणास्त्राच्या चाचणीदरम्यान न्यूक्लियर वॉरहेड्स डिटेक्ट केले आहेत.
जिनपिंग यांचे चीनवर पूर्ण वर्चस्व
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आता स्वतःला कमांडर इन चीफ जाहीर केले आहे.
- गुरुवारी त्यांनी याची घोषणा केली. आता ते चीनमधील आतापर्यंतच्या सर्व नेत्यांमध्ये सर्वात शक्तीशाली झाले आहेत.
- बुधवारी आणि गुरुवारी ते चीनी जनतेसमोर मिलिटरीच्या युनिफॉर्ममध्ये आले.
पुढील स्लाइडमध्ये, अमेरिका नाराज.....