आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चीनच्या रस्त्यांवर धावणार ट्रान्सिट एलिव्हेडेट बसेस, ट्रायल सुुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग (चीन)- चीनची झपाटयाने प्रगती सुरु आहे. आज या प्रगतीचे खरे गुपित समोर आले. तेही ट्रान्सिट एलिव्हेटेड बसच्या माध्यमातून. मे महिन्यात वृत्त होते, की सिटी ट्रान्सपोर्ट सिस्टीम सुधारण्यासाठी चीन अशा बसेसच्या संकल्पनेवर काम करत आहे. आज बसेसची ट्रायल घेण्यात आली. काही दिवसांत अशा बसेस चीनच्या रस्त्यांवर धावताना दिसून येतील. याला म्हणतात एखाद्या कामाची अंमलबजावणी.
नागरिकांना सिटी ट्रान्सपोर्टच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा वेळ वाचावा, प्रवासाचा खर्चही कमी यावा या साठी सर्व देशांमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. पण याबाबत चीनमध्ये एक भन्नाट प्रयोग करण्यात आलाय. बीजिंग इंटरनॅशनल हायटेक एक्सोपमध्ये हा प्रोजेक्ट सादर करण्यात आला होता. क्विन हुआंग शहरात या बसची ट्रायल घेण्यात आली. याला ट्रान्सिट एलिव्हेटेड बस किंवा ट्रान्सिट एक्सप्लोस बस असे नाव देण्यात आले आहे.
रस्त्यावरील इतर वाहनांच्या वरुन ही बस जाईल. त्यासाठी केवळ कार जातील असा विशेष रस्ता तयार केला जाईल. त्यानंतर त्यावरुन ही बस जाऊ शकेल अशा पायाभुत सुविधा उभारल्या जातील. ही बस इतर वाहनांच्या वरुन जात असल्याने ट्राफिक जामचा प्रश्न सुटेल. कारण ट्राफिक जामला बहुतांश वेळा भल्यामोठ्या बसच जबाबदार असल्याचे आढळून आले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या... कसा असेल प्रोजेक्ट.... काय येईल खर्च.... प्रवाशांचा कसा वेळ वाचेल.... आणि बरेच काही.... हा प्रोजेक्ट कसा काम करेल याचा व्हिडिओ बघा अखेरच्या स्लाईडवर....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...