आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक निर्बंध असूनही चीनमध्‍ये राहतात मुस्लिम, जगतायत अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिनजियांग प्रांतात नमाज पठण करण्‍यापूर्वी आपल्या घराच्या बाहेर तोंड धूताना एक उइगर मुस्लिम. - Divya Marathi
शिनजियांग प्रांतात नमाज पठण करण्‍यापूर्वी आपल्या घराच्या बाहेर तोंड धूताना एक उइगर मुस्लिम.
जगभरात रमझान ईद साजरी केली जात आहे. जॉर्डन, इराक, अफगाणिस्तान, सीरिया, इराण, इंडोनेशियासह अनेक देशांमध्‍ये बुधवारपासून ईदची तीन दिवसांचा उत्सव सुरु झाला आहे. दुसरीकडे भारतासह काही आशियाई देशांमध्‍ये ईद गुरुवारी साजरी करण्‍यात आली. मात्र चीनमध्‍ये मुस्लिम समुदायावर बरीच निर्बंध आहेत. असे असूनही येथे ईद साजरी करण्‍यात आली. चीनमध्‍ये 2 कोटींपेक्षा जास्त मुस्लिम राहतात. या देशात 30 हजारांपेक्षा मशिदी व 10 मुस्लिम वांशिक गट आहेत. यातील एक समुदाय असा आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून सेन्सॉरशीपचा सामना करत आहे. हे आहेत उइगर मुस्लिम. जाणून घ्‍या, कोण आहेत उइगर मुस्लिम...
- उइगर, तुर्कस्तानी मुस्लिम आहेत. शिंजियांग प्रांतात 45 टक्के उइगर मुस्लिमांची लोकसंख्‍या आहे.
- उइगर मुस्लिम स्वत:ला चीनचे रहिवाशी मानत नाहीत.
- चीनच्या म्हणण्‍यानुसार, उइगर नेते मुस्लिम बहुल शिंजियांग प्रांतात दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत.
- उइगर मुस्लिम तुर्की भाषा बोलतात.
- चीन, पाकिस्तानवर उइगर मुस्लिमांना भडकवल्याचा आरोपही लावला आहे.
- चिनी सरकारनुसार, पाकिस्तानच्या काही भागात उइगर मुस्लिमांना दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
नमाज पठण नाही, दाढी राखू शकत नाही
- 2014 मध्‍ये रमझानच्या वेळी चीन सरकारने उइगर मुस्लिमांना पाच वेळा नमाज पठणावर बंदी घातली होती. याला बराच विरोध झाला.
- ताइपेकला जगातील सर्वात छोटी टोपी असल्याचे म्हटले जाते. जर एखादी उइगर महिलेने ही टोपी घातल्यास याचा अर्थ होतो ती विवाहित आहे.
- चीनमध्‍ये उइगर मुस्लिमांना दाढी राखण्‍यास मनाई आहे. उइगर महिलांना बुरखा घालायलाही बंदी आहे.
- चीन सरकारने 2008 मध्‍ये दाढी ठेवण्‍यावर बंदी घातली होती. कारण दंगे वाढत होते. मात्र आजही असे कित्येक उइगर आहेत जे लांब दाढी ठेवतात.
- उइगर महिला बुरखा घालून पेट्रोल पंप, स्टेशन, बँक आणि हॉस्पीटलमध्‍ये जाऊ शकत नाही. ती सरकारी नोकरीही करु शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे आहेत उइगर मुस्लिमांचे जगणे...