आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण चिनी सागरातील आक्रमक चीनला अमेरिका आव्हान देणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी :दक्षिण चिनी सागरात चीनची वागणूक अत्यंत आक्रमक राहिली आहे. ही वागणूक बदलली नाही तर अमेरिका त्याला आव्हान देईल, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तैवानी प्रमुखांशी झालेल्या चर्चेनंतर उभय देशांत काही दिवसांपासून तणाव सुरू आहे.
अमेरिकेचे प्रशांत सागरी सुरक्षा दलाचे अॅडमिरल हॅरी हॅरिस म्हणाले, दक्षिण चिनी सागरावर चीनने वारंवार आपला दावा सांगितला आहे. परंतु ही बाब अमेरिका कधीही स्वीकारणार नाही. त्यासाठी चीनने सागरी क्षेत्रात काही कृत्रिम बेटांची उभारणी केली आहे. त्यालादेखील अमेरिकेने विरोध केला आहे. शक्य असणाऱ्या काही मुद्द्यांवर चीनशी आम्ही निश्चितपणे सहमत आहोत, परंतु विरोध होणे गरजेचे आहे.
अशा ठिकाणी ठामपणे विरोध केला जाईल. दक्षिण चिनी सागरातील मालकीचा चीनचा दावाही त्याच प्रकारातील आहे. अर्थात, पूर्णपणे चुकीचा आहे. त्यासाठी संघर्षाचीदेखील आमची तयारी आहे, असे हॅरिस यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांनी विजयी झाल्यानंतर तैवानचे नेते त्साई इंग-वेन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती.
बातम्या आणखी आहेत...