आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन अवजड उद्योगांतील 5 लाख नोकऱ्यांमध्ये करणार कपात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या श्रम मंत्रालयाने अवजड उद्योग क्षेत्रातील ५ लाख नोकऱ्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला. वर्ष २०१७ च्या अखेरपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. पोलाद, कोळसा उद्योगातील उत्पादकता अतिरिक्त असून त्यामुळे जागतिक किमतींवर विपरीत परिणाम होत असल्याचे चीनने म्हटले आहे. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. बाजारात गरजेपेक्षा अधिक माल पडून आहे, असा दावा चीनने केला. 

नोकऱ्यांमध्ये कपात होणार असली तरीही या कामगारांना इतरत्र संधी देण्यात येईल, असे आश्वासन श्रम मंत्री यीन वेईमीन यांनी दिले. त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार पतपुरवठा करेल किंवा स्वेच्छानिवृत्तीच्या चांगल्या योजना देण्यात येतील, असे श्रम मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. स्टील, कोळसा, अॅल्युमिनियम, सिमेंट, काच उत्पादन कंपन्यांच्या नोकऱ्यांवर याचा थेट परिणाम लवकरच दिसून येईल.

१२ दशलक्ष लोक दारिद्र्यातून मुक्त
वर्ष २०१६ मध्ये चीन सरकारने देशातील १२ दशलक्ष लोकांना दारिद्र्यातून मुक्त केल्याचा दावा सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला. यासाठी सरकारने ३४.३३ अब्ज डॉलर्सची तरतूद केली होती. गरिबी निर्मुलन आणि विकास विभागाच्या प्रवक्त्या स्यू गोशिया यांनी याविषयी माहिती दिली. ९०० प्रदेशांतील ३० दशलक्षांपेक्षा अधिक लोकांना सरकारने या योजनेचा लाभ दिला.  ८.१ दशलक्ष कुटुंबांना याचा लाभ मिळाला. वर्ष २०१७ मध्ये देशातील १० दशलक्ष लोकांना दारिद्र्यातून मुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. 
बातम्या आणखी आहेत...