आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • China Will Organize Election Of Hong Cong In 2017

हाँगकाँगला झटका; चीन निवडणूक प्रक्रिया राबवणार, 2017 मध्ये होणार निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग - हाँगकाँगमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या लोकशाही समर्थक आंदोलकांना तगडा झटका बसला आहे. बुधवारी हाँगकाँग सरकारने आगामी निवडणुकीसाठी प्रस्तावित निवडणूक सुधारणा कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये लोकशाही समर्थकांची कोणतीही मागणी मान्य करण्यात आली नाही. २०१७ च्या निवडणुकीसाठी चीनच्या योजनेलाच मंजुरी देण्यात आली. याचा अर्थ निवडणूक लोकशाही पद्धतीने होणार नसल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे.
हाँगकाँग प्रशासनामध्ये दुस-या क्रमांकाचे सर्वात वरिष्ठ नेते कॅरी लॅम यांनी हा प्रस्ताव सादर केला. ही तरतूद हाँगकाँग राज्यघटना आणि चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीशी संबंधित निर्णयाच्या अंमलबजावणीतून करण्यात आली आहे. हाँगकाँगमध्ये २०१७ मध्ये निवडणूक होईल.

कशी होणार निवडणूक
- उमेदवारांची निवड बीजिंग समर्थक १२०० जणांची समिती करेल. उमेदवार होण्यासाठी ही समिती कमीत कमी १२० सदस्यांचा पाठिंबा आवश्यक ठरेल.
- समितीने निवडलेल्या उमेदवारांना समितीच्या दुस-या टप्प्यातील मतदानातून जावे लागेल. यामध्ये ६०१ पेक्षा जास्त मतदान प्राप्त करणा-यास सार्वत्रिक निवडणुकीची उमेदवारी मिळेल.