आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घोड्यावरच जातो ऑफिसला, Traffic ला कंटाळल्याने शोधली शक्कल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या वुहान शहरात गेल्या काही वर्षात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे याला कंटाळलेल्या एका तरुणाने यापासून सुटका मिळवण्यासाठी एक भलतीच शक्कल शोधून काढली आहे. त्याने कार घराच्या पार्किंगमध्ये लावली आणि एक घोडाच खरेदी केली. आता तो रोज या घोड्यावरच ऑफिसला जातो. त्यामुळे त्याला सिग्नलवरही थांबावे लागत नाही. हा मार्ग इको-फ्रेंडलीही आहे.

चीनच्या सोशल साइट्सवर सध्या त्याचे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. या प्रयोगाबाबत बोलताना हा तरुण म्हणाला की, दरोरोज ट्राफिकमुळे त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता. त्यामुळे त्याने बाइकचाही पर्याय वापरून पाहिला. पण सारखं थांबावं लागत असल्याने तो त्रासून गेला होता. या सर्व प्रकारामुळे ऑफिसला गेल्यावर त्याला थकवाही यायचा. तो फार आनंदाने घोडेस्वारी करतो असे नाही. तर, ऑफिसमधून येताना कधी कधी तो घोड्याबरोबर पायीही चालतो. लोकांना हा प्रकार पाहून आश्चर्य वाटते. पण लोकांचा दृष्टीकोन काय आहे याच्याशी आपल्याला काही संबंध नाही, असे हा तरुण स्पष्टपणे सांगतो.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO
 
बातम्या आणखी आहेत...