शेनझेन - हे छायाचित्र चीनमधील शेनझेन एअरपोर्टचे असून येथे पहिल्यांदाच सुरक्षेसंदर्भात रोबोट “एनबोट’चा वापर करण्यात आला आहे. एअरपोर्टच्या टर्मिनल-३ च्या डिपार्चरच्या परिस्थितीवर पेट्रोलिंग करताना हा रोबोट दिसत आहे. याचे मुख्य काम फेशियल रिकॉग्निशन आहे.
‘एनबोट’ मध्ये चार हाय डेफिनेशन कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामध्ये येथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे तसेच त्यांच्या नातेवाइकांचे छायाचित्र घेण्यात येत आहे. रोबोट हे सर्व फोटो आपल्या मनुष्य सहकार्याला म्हणजेच सुरक्षा रक्षकांना पाठवतो. ते याचा वापर अॅनालिसिस करण्यासाठी करतील. एखाद्या व्यक्तीकडे शस्त्र किंवा प्रतिबंधित वस्तू असल्यास, तो रोबोटच्या समाेर येताच पकडला जावा यासाठी रोबोमध्ये कॅमेऱ्यासह यामध्ये स्कॅनिंग डिव्हाइसदेखील लावण्यात आले आहे. एनबोट स्वत: १८ किमी प्रतितासाच्या वेगाने चालू किंवा पळू शकतो. विशेष म्हणजे या टर्मिनलला जास्त पायऱ्यादेखील नाहीत. यामुळे कर्तव्य बजावताना या रोबोटला जास्त त्रास सहन करावा लागत नाही.