आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचे मानवरहित विमान लवकरच बाजारात, सीएच-5 रेन्बोच्या उत्पादनाला सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनने अमेरिकेला आव्हान देण्यासाठी व्यावसायिक तत्त्वावर सीएच-५ रेन्बो या मानवरहित विमानांच्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. अमेरिकेचे एमक्यू-९ रिपर हे ड्रोन जमिनीवरील लक्ष्य अचूकपणे टिपू शकते.

बीजिंग विद्यापीठातील अवकाश संशोधन विभागातील प्रोफेसर वँग साँग यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात सीएच-५ रेन्बो श्रेणीतील मानवरहित विमानांचे मोठ्या पातळीवर उत्पादन घेण्यात आले. त्यामुळे चीन आता ड्रोनच्या निर्यातीसाठी सज्ज झाला आहे, हे स्पष्ट आहे. लष्करीदृष्ट्या रेन्बो अत्यंत वजनदार अशा प्रकारचे ड्रोन आहे. मात्र, रेन्बोमध्ये एमक्यू-९ च्या तुलनेत काही त्रुटी जरूर आहेत, हे वँग यांनी कबूल केले. चीनच्या हेबेई प्रांताच्या उत्तरेकडे रेन्बो-५ ची यशस्वी चाचणी घेण्यात आली. विमानाचे पंखे २१ मीटरचे आहेत. वजन वाहून नेण्याची क्षमता १ हजार किलाेग्रॅमची क्षमता आहे. हवेत ६० तास राहण्याची क्षमता आहे.

सर्व प्रकारच्या विमानांत कमकुवतपणा
खरे तर चीनने तयार केलेल्या सर्व प्रकारच्या विमानांत एक प्रकारचा कमकुवतपणा दिसून येतो. त्याला सीएच-५ रेन्बो अपवाद असण्याचे कारण नाही, असे वँग यांनी सांगितले.

अमेरिकेचे सर्वात महागडे ड्रोन
अमेरिकेने तयारी केलेले रिपर ड्रोन जगातील सर्वात महागडे ड्रोन मानले जाते. त्याच्या निर्मितीवर १६.९ दशलक्ष डॉलर्स खर्च झाला होता.

दोन्ही ड्रोनमधील फरक
अमेरिकेचे ड्रोन १२ हजार ते १५ हजार मीटर उंचीपर्यंत सहजपणे झेपावू शकते. अर्थात जमिनीवरून हवेतील हल्ल्यापासून या ड्रोनचा बचाव शक्य होतो. चीनच्या रेन्बोची झेपावण्याची क्षमता ९ हजार मीटर उंच एवढी आहे. त्यामुळे काही जमिनीवरील हल्ल्यांचा धोका या ड्रोनला आहे. त्याशिवाय रेन्बोचे इंजिनदेखील कमकुवत आहे, अशी माहिती वँग यांनी दिली. अमेरिकेच्या खर्चाच्या तुलनेत निम्म्या किमतीत रेन्बो तयार झाले आहे.
बातम्या आणखी आहेत...