आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियाबाबत चीनचा ट्रम्प यांना सल्ला; प्रक्षोभक वक्तव्ये टाळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन / बीजिंग- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उत्तर कोरियाच्या मुद्द्यावर शनिवारी फोनवरून संभाषण झाले. कोरिया प्रदेशात अगोदरच तणावाची परिस्थिती आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी प्रक्षोभक वक्तव्य देणे आणि काही कारवाई करण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. या गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण त्यामुळे कोरिया प्रदेशात तणाव वाढू शकतो, असा सल्ला जिनपिंग यांनी फोनवरून ट्रम्प यांना दिला आहे.  

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी अलीकडेच अमेरिकेला हल्ल्याची धमकी दिली होती. अमेरिकेच्या गॉम बेटावर हा हल्ला करून दाखवू, असे धमकावले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर आणखी आर्थिक निर्बंध लादले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने ही धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर जिनपिंग आणि ट्रम्प यांच्यातील फोन संभाषणाला महत्त्व आले आहे. शी म्हणाले, कोरियाचा प्रश्न सोडवण्यासाठी चीन अमेरिकेसोबत काम करण्यासाठी तयार आहे. परंतु संबंधितांनी टिप्पणी आणि कारवायांची भाषा टाळणे योग्य होईल. कारण त्यामुळे कोरियन प्रदेशातील तणाव आणखी वाढू शकतो. दरम्यान, जुलैपासून हा तणाव सुरू आहे.  

‘कोरियाचा प्रश्न सोडवण्यासाठी  भारताची चांगली मदत होऊ शकते’ : उत्तर कोरियासोबतचा संघर्ष थांबवण्यासाठी भारताची चांगली मदत होऊ शकते. अणुकार्यक्रमामुळे किती नुकसान होऊ शकते आणि हा प्रश्न किती गंभीर आहे, ही बाब भारत उत्तर कोरियाच्या नेतृत्वाला समजावून सांगू शकतो. भारताने हा मुद्दा मांडल्यास तो सर्वांपर्यंत पोहोचेल,  असे अमेरिकेचे पॅसिफिक कमांडर हॅरी हॅरिस यांनी म्हटले आहे.   

अण्वस्त्र कार्यक्रम बंद होणे आवश्यक  
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी कोरियाचा प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेद्वारे प्रयत्न करण्याबाबत सहमती व्यक्त केली. त्याचबरोबर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद होणे आवश्यक असल्याचे मत उभय नेत्यांनी आपल्या संभाषणातून व्यक्त केले. अमेरिका-चीन संबंधांच्या दृष्टीने ट्रम्प यांच्यासोबत फोनवरील चर्चा महत्त्वाची आहे, असे जिनपिंग यांनी म्हटले. दोन्ही नेत्यांच्या संभाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
बातम्या आणखी आहेत...