आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज देताना मुलींकडून घेतला जातो न्‍यूड फोटो, परतफेड न झाल्‍यास होताे व्‍हायरल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीनमध्‍ये सध्‍या कर्ज वसुलीसाठी एक अजब पद्धत सावकाराने अमलात आणली आहे. ज्या मुलींना पैशांची गरज आहे, त्यांनी त्‍यांचे न्यूड फोटो पाठवावे, त्‍यानंतर कर्ज घ्‍यावे, अशी चक्‍क ऑफरच चीनमधील एक वेबसाईट दिली आहे. हा धक्‍कादायक प्रकार सध्‍या चांगलाच चर्चेत आहे.
- येथे खाजगी सावकार तरुणींना न्यूड फोटो व आयडी कार्डच्या आधारावर कर्ज देतो.
- कर्ज वेळेत न फेडल्यास फोटो व्‍हायरल करण्‍यात येतील अशी अट ठेवली जाते.
- चीनमधील माध्‍यमांनी यासंदर्भातील वृत्‍तही दिले आहे.
- अशा प्रकारच्‍या अवैध व्‍यवहार चीनमध्‍ये वाढत असल्‍याचे सांगत आहे.
- अनेक तरुणींनी आपले न्‍यूड फोटो देऊन गरजेपोटी कर्ज घेतले आहे.
- यासंदर्भात स्‍थानिक माध्‍यमांमध्‍ये बातम्‍या आल्‍यानंतर वेबसाईटच्या सावकाराने कर्ज
देणे बंद केले आहे.
पीडित तरुणीने सांगितला प्रसंग
एका कर्जबाजारी तरुणीने चीनमधील वृत्‍तपत्राला माहिती दिली की, ऑनलाईन वेबसाईटच्या सावकाराने आठवड्याच्या मुदतीने 500 युआन म्‍हणजे 5,000 रुपये एवढे कर्ज दिले होते. कर्जाचा दर 30 टक्के होता. काही दिवसात मात्र ही रक्‍कम वाढून 56 लाख रुपयांवर गेली आहे. त्‍यामुळे कर्ज फेडण्यासाठी तरुणीने आणखी कर्जाची मागणी केली. त्यासाठी सावकाराने तिला न्यूड फोटोची मागणी केली, असे तरुणीने सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा किती धक्‍कादायक आहे प्रकरण..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...