आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आदर्श गावात छतांवरच केली जाते शेती; भूकंप, अतीवृष्टीपासूनही संरक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - नव-नवीन आयडिया आणि जुगाडांसाठी चीन नेहमीच एक पाऊल पुढे आहे. याचेच आणखी उदाहरण चीनच्या सिचुआन प्रांतातील एका गावाने प्रस्तुत केले आहे. येथील जिंताई गावात लोकांनी आपल्या छतांवरच शेती करायला सुरुवात केली आहे. ग्रामस्थ आप-आपल्या छतांवर हव्या त्या भाज्या आणि फळे पिकवतात. सतत होणाऱ्या भूकंपांमुळे येथील गावकऱ्यांनी मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. मात्र, सरकारने इको फ्रेन्डली तंत्रज्ञानाने गावकऱ्यांची मदत करून एक आदर्श गाव बनवले आहे. 
 
> 2008 मध्ये आलेल्या वेनचुआन भूकंपात जिंताई गावातील 80 टक्के लोकसंख्येचा बळी गेला. गावातील 50 टक्के लोक बेघर झाले. 
> भूकंपानंतर गावाचा पुनरविकास झाले. मात्र, यानंतर 2011 मध्ये अतीवृष्टी आणि भूस्खलनाने गाव पुन्हा वाहून गेले. 
> यानंतर सरकारने गावकऱ्यांच्या मदतीसाठी हाँगकाँग विद्यापीठाकडून अशा घरांचे डिझाइन घेतले जे भूकंप आणि इतर नैसर्गिक संकटातही टिकू शकतील. या घरांमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात स्थैर्य लाभले. 
> या मोहिमेत सरकारने अशा 22 इमारती उभारल्या, ज्यांच्या छतांवर शेती करणे देखील शक्य होते. केवळ शेतीच नव्हे, तर या छतांवर प्राणी सुद्धा पाळले जाऊ शकतात. 
> घरांना अतीवृष्टीपासून वाचवण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरू करण्यात आले. त्यामुळे, अतीवृष्टी झाली तरीही घरे वाहून जाणार नाही. 
> डोंगराळ भागात डिझाइन करण्यात आलेल्या या गावात रस्ते प्रशस्त ठेवण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांना आपली दुकाने लावता येतील. 

पुढील स्लाइड्सवर, या आदर्श गावाचे आतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...