सध्या लोकांना मोबाईलचे प्रचंड व्यसन लागले आहे. मोबाईल फोनशिवाय जराही लोक राहू शकत नाहीत. त्यातल्या त्यात मोबाईल गेमच्या व्यसनाविषयी तर बोलायलाच नको. ऑफिसची मिटिंग असो, घरी आलेले पाहुणे असोत, एखादा महत्त्वाचा क्षण असो काही लोक मोबाईलवर सतत गेम खेळताना दिसून येतात.
चीनमधील या व्यक्तीने तर मोबाईलवर गेम खेळण्याचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. तो स्कूटरवरुन जात होता. त्याला एका कारने धडक दिली. तो स्कूटरवरुन खाली पडला. त्यानंतर त्याने मोबाईलवर गेम खेळणे पसंत केले. दुसरा कुणी असता तर काय नुकसान झाले याचा आढावा घेतला असता. कार चालकाला शिव्या मारल्या असत्या. पोलिसांना फोन करुन बोलविले असते. पण या पठ्ठ्याने गेमला प्रायॉरिटी दिली. जरा वेळाने पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी त्याला उठण्यास सांगितले. पण तो म्हणाला, की अॅम्ब्युलंस येऊ द्या. मी त्यानंतर उठेन. तोपर्यंत गेम खेळू द्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, पुढे काय झाले.... विशेष म्हणजे तो जखमीही झालेला नव्हता...