आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:अंमली पदार्थांचा तस्कर, जो ठेवायचा एके-47 आणि चांदीचे पिस्तूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - 'चीनो अँट्राक्स' नावाच्या ड्रग माफ‍ियाची लाइफस्टाइल श्रीमंताला लाजवेल अशी होती. मात्र त्याच्या एका चुकीमुळे त्याला आजीवन तुरुंगात टाकण्‍यात आले आहे. वास्तविक अँट्राक्सने इंस्‍टाग्रामवर आपल्या सोन्याची एके-47 आणि चांदीची पिस्तुलसह 28 छायाचित्रे पोस्ट केली होती. नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. अमेरिकन न्यायालयाने त्याला अंमली पदार्थ तस्करीत दोषी आढळल्याने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे.
माध्‍यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्या गुन्हेगाराचे खरे नाव जोस रॉड्रिगो अरेचिगा गॅम्बोआ आहे. अँट्राक्सने हजारो टन कोकीन आणि गांजाचे तस्करी केली होती. यातून मिळालेल्या कमाईतून तो आरामदायी जीवन जगू लागला होता. आरामदायी आयुष्‍याची जाणीव त्याच्या नावाची बूट आणि बिअरवरुन करता येई. अँट्राक्सकडे फरारी कारही आहे. त्याचे फोटो इंन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती.

असा झाला अटक
अँट्राक्सला पूर्वी कोणीही पाहिले नव्हते. तसेच त्याच्याविषयी कोणाला माहिती नव्हती. त्याने आपल्या आरामदायी आयुष्‍याची फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. यामुळे पोलिसांना शंका आली. खूप चौकशीनंतर पोलिसांना कळले, की तो सर्वसामान्य माणूस नाही. यानंतर नियोजन करुन त्याला अटक केले. पुन्हा चौकशीत त्याने सर्व कबूल केले.34 वर्षांच्या अँट्राक्सला न्यायालयाने आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच 10 लाख डॉलरची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने त्याला सॅनडिएगोत अंमल पदार्थ पुरवठा केल्याच्या आरोपामध्‍ये दोषी आढळले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अंमलपदार्थ तस्कराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले काही फोटोज...