आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिकल अटॅकने सीरियामध्ये 35 मुलांसह 71 जखमी, आपल्याच नागरिकांना केले लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो - सीरियामधील अलेप्पो शहरात बंडखोरांच्या ताब्यातील भूभागावर क्लोरिन गॅस हल्ला झाला. सीरिया सरकारने हेलिकॉप्टरमधून हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यात 37 लहान मुलांसह 70 लोक जखमी झाले. हल्ल्यानंतर लोकांना श्वासोच्छास घेण्यात अडचण होत आहे. हल्ल्यानंतर सोशल मीडियामध्ये काही फोटो व्हायरल झाले आहेत, त्यात हॉस्पिटलमध्ये मास्क लावलेली मुले दिसत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्यांचा दावा, क्लोरिन गॅस सिलिंडर सापडले
- स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले, की सरकारी यंत्रणांनी मंगळवारी अल-सुक्कारी येथे हेलिकॉप्टरमधून दोन बॅरल बॉम्ब टाकले.
- या बॉम्बमध्ये क्लोरिन गॅस सिलिंडर होते. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला तर 71 जण जखमी आहेत.
- सीरियन सिव्हिल डिफेन्स आणि सीरियन अमेरिकन मेडिकल सोसायटीने उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल लहान मुले आणि जखमींचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
- अनेक लहान मुले हॉस्पिटलमध्ये तोंडाला मास्क लावून बसलेले या फोटोंतून दिसतात.
गंभीर जखमींमध्ये गर्भवती महिला
- स्थानिक पत्रकाराने टेक्स्ट मॅसेजमध्ये सांगितले, की 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यात एक गर्भवती महिला देखील आहे.
- सीरियन सिव्हिल डिफेन्सचे सदस्य इब्राहिम अल्हाज यांनी सांगितले, की हल्ल्यानंतर काही वेळातच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. आम्हाला तिथे चार क्लोरिन सिलिंडर दिसले.
- सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंमध्येही क्लोरिन सिलिंडर दिसतात.
- विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या एका टीमने नुकताच एक अहवाल दिला, त्यात सांगितले आहे की 2014 आणि 2015 मध्ये झालेल्या केमिकल अटॅकसाठी सीरियन गव्हर्नमेंट आणि आयएसआयएस जबाबदार होते. या हल्ल्यात 1700 लोक मारले गेले होते.
सरकारवर केमिकल अटॅकचे यापूर्वीही आरोप
- येथील राष्ट्रपती बशर अल असद यांच्यावर स्वतःच्या देशातील नागरिकांवर बॅरल बॉम्बचा वापर केल्याचा यापूर्वीही आरोप झाला आहे.
- अलेप्पोच्या पूर्वभागात 2.5 लाख तर, पश्चिम भागात 12 लाख लोक राहातात.
- यूएनच्या माहितीनुसार, 2011 मध्ये जेव्हा यादवी युद्ध झाले होते तेव्हा तीन लाख लोक मारले गेले होते तर 11 लाख बेघर झाले होते.

कसे सुरु झाले सीरियाचे संकट
- 2011 मध्ये घडलेल्या एका छोट्या घटनेने सिव्हिल वॉरचे रुप घेतले होते. काही मुलांच्या अटकेनंतर लोक संतप्त झाले होते.
- जुलै 2011 मध्ये सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी सीरियन आर्मी अधिकाऱ्यांच्या एका गटाने नोकरी सोडून फ्री सिरियन आर्मी स्थापन केली.
- 2011-2012 मध्ये अनेक सुसाइड बॉम्ब अटॅक झाले. अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीने सीरियन लोकांना जिहादी होण्याचे आवाहन केले. आता येथे आयएसआयएस देखील अॅक्टिव्ह आहे.
- असदला रशियाचे पाठबळ आहे. तर, अमेरिकेवर आरोप आहे की ते बंडखोरांना रसद पुरवत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, केमिकल अटॅकनंतरचे दृष्य
बातम्या आणखी आहेत...