आंतरराष्ट्रीय डेस्क - दक्षिणी फिलिपाइन्सच्या मरावी शहरावर IS च्या दहशतवाद्यांचा मागच्या 3 आठवड्यांपासून कब्जा आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, या मुस्लिमबहुल शहरात हजारोंच्या संख्येने मुस्लिम तरुणांनी दहशतवादी संघटनेत प्रवेश केला आहे.
जिवंत राहण्यासाठी काहीही खावे लागतेय...
- स्थानिक लोकांबाबत असे सांगितले जात आहे की, भुकेने बेजार झालेले हे लोकं जिवंत राहण्यासाठी कपडे खायला मजबूर झाले आहेत. येथून जीव मुठीत धरून पळालेल्या 5 ख्रिश्चनांनी सांगितले की, या शहरातून पळून जाण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांना हिजाब उधार मागितले. इतर लोकही हेच करत आहेत.
ख्रिश्चनांची करत आहेत हत्या...
दहशतवाद्यांच्या कचाट्यातून जीव वाचवून पळालेल्या एका व्यक्तीने सांगितले, "आम्ही शहरातून पळून जाताना शहराच्या शेवटच्या भागापर्यंत पळालो. एका बंदूकधाऱ्याला पाहिल्यावर तर आम्हाला पुन्हा पुन्हा शरीर झाकून घ्यावे लागले."
2 लाख लोकांनी आतापर्यंत केले आहे पलायन
- स्थानिक संघटनेतील तरुणांनी आयएस सोबत जोडल्यानंतर या शहरात उपद्रवी कारवाया केल्या. यामुळे 23 मे नंतर 2 लाख लोकांना येथून पळ काढावा लागला आहे.
-दहशतवाद्यांना ख्रिश्चनांचे अपहरण आणि हत्याही केली आहे. सैन्याच्या अंदाजानुसार 300 ते 600 नागरिक आताही अडकलेले आहेत. त्यांच्या उपयोग ढालीसारखा करून दहशतवादी क्रूर कारवाया करत आहेत.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कसे आहेत मरावी शहराचे हाल...