आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इजिप्तच्या चर्चमधील 2 स्फोटांमध्ये 45 जणांचा मृत्यू, 120 हून जास्त लोक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो- इजिप्तच्या टान्टा व अलेक्झांड्रिया या शहरांतील चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी झालेल्या दोन बाॅम्ब स्फोटांत ४५ जणांचा मृत्यू, तर १२० हून जास्त लोक जखमी झाले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  

पहिला स्फोट राजधानी कैरोपासून १२० किलोमीटर अंतरावरील टान्टाच्या जॉर्ज कॉप्टिक चर्चमध्ये झाला. ईस्टरच्या पूर्वी अालेला हा पहिला रविवार (पाम संडे) असल्यामुळे भाविकांची प्रार्थनेसाठी अलोट गर्दी होती. प्रार्थनेदरम्यान एका व्यक्तीने चर्चमध्ये स्फोटके ठेवली होती. त्यात २५ जणांचा मृत्यू, तर ७१ जखमी झाले. टान्टा शहरातील स्फोटाच्या तासाभराने अलेक्झांड्रियातील सेंट मार्क चर्चजवळ आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवला. त्यात ११ जण जागीच ठार झाले, तर ६६ जखमी झाले, असा दावा प्रत्यक्षदर्शीने केला. 

टान्टामधील हल्लाही आत्मघाती हल्लेखोराने घडवला होता, असा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी तातडीने राष्ट्रीय सुरक्षा मंडळाची बैठक बोलावली आहे.पाम संडे ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण ईस्टरच्या अगोदर साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांपासून ख्रिश्चन समुदायावर अनेक हल्ले सुरू आहेत. इजिप्तच्या एकूण लोकसंख्येत ख्रिश्चन समुदाय १० टक्के आहे. 
  
पोप यांच्या दौऱ्याआधी स्फोटके आणली
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस २८ व २९ एप्रिलदरम्यान इजिप्त भेटीवर आहेत. त्या पार्श्वभूमीवर हल्लेखोरांनी काही आठवडे अगोदर स्फोटके आणून ठेवली आहेत. त्यामुळे अतिरेकी कारवाया वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पोप आपल्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष सिसी, कॅथॉलिक समुदायाचे नेते यांच्याशी चर्चा करतील. 
बातम्या आणखी आहेत...