आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने कारवाई केली नाही तर अमेरिका करणार; सीआयए प्रमुखांनी दिला पाकला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माइक पॉम्पियो - Divya Marathi
माइक पॉम्पियो

वॉशिंग्टन / इस्लामाबाद- अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर विभागाचे (सीआयए) संचालक माइक पॉम्पियो यांनी पाकिस्तानला जाहीर आवाहन केले आहे.  पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर पाकने कारवाई केली नाही  तर अमेरिका हे अड्डे नष्ट करेल. अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम  मॅटिस पाक दौऱ्यावर असताना असा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय जिम मॅटिस पाकला सांगतील, असे पॉम्पियो यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना थारा देणाऱ्यांविरुद्ध थेट कारवाई करण्याविषयी अमेरिका गंभीर असल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या व्हॉइस ऑफ अमेरिका रेडिआेशी बोलताना सीआयए प्रमुखांनी हा इशारा पाकिस्तानला दिला आहे. मॅटिस यांनी शांतपणे चर्चा करून तोडग्याचा मार्ग शोधावा. मात्र, अमेरिका कठोर पावले उचलण्यास सज्ज असल्याचे ते म्हणाले.  


दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण सचिव जिम मॅटिस सोमवारी पाकिस्तानमध्ये दाखल झाले. पाकिस्तानची भूमी दहशतवाद्यांना थारा देते हा अमेरिकेचा आरोप कायम असून त्यावर तोडगा काढण्यासाठीच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद याची नजरकैदेतून गेल्या महिन्यात मुक्तता करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मॅटिस यांचा पाक दौरा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. रावळपिंडीच्या नूर खान विमानतळावर सोमवारी त्यांचे आगमन झाले. पाकिस्तानचे संरक्षण आणि परराष्ट्रमंत्र्यांनी त्यांचे येथे स्वागत केले.  

 

पुढील स्‍लाइ्ड वर वाचा, अफगाणिस्तानच्या व्यापारी विकासात भारताची सकारात्मकता सिद्ध : अमेरिका... 

 

बातम्या आणखी आहेत...