आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडून होत नसेल तर आम्हीच पाकिस्तानात घुसू, अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुखांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - पाकिस्तानात पोसल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांवर कारवाईचे सांगून वैतागलेल्या अमेरिकेने पाक सरकारवर संताप व्यक्त केला. पाक सरकारने त्यांच्या देशातील दहशतवाद्यांना लक्ष्य करून संपवले नाही, तर अमेरिका कुठल्याही थराला जाईल. परिणामी, पाकिस्तानात घुसून त्यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त केले जाईल असा इशारा अमेरिकेने दिला. अमेरिकेची सर्वोच्च गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख माइक पॉम्पियो यांनी हा इशारा दिला आहे.

 

> विशेष म्हणजे, अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि पेंटागन प्रमुख जेम्स मॅटिस सोमवारपासून पाकिस्तान दौऱ्यावर असतानाच ही वॉर्निंग आली आहे. ते पाकचे पीएम खाकान अब्बासी आणि लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी दहशतवादाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. 
> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आशियासाठी नवे परराष्ट्र धोरण अवलंबले आहे. त्याचा एक भाग म्हणून पाकिस्तानवर दहशतवाद विरोधी कारवायांसाठी दबाव टाकला जात आहे. पाक कारवाई करत नसल्याने अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध खराब होत आहेत. 
> CIA चीफ माइक पॉम्पियो यांनी रीगन नॅशनल डिफेन्स फोरमच्या एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानला सरळ शब्दात इशारा दिला आहे. मॅटिस सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. तेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सांगतील की ट्रम्प यांना काय हवे आहे. पाकिस्तानने आमच्यासोबत येऊन अफगाणिस्तानात कारवाया कराव्या अशी इच्छा आहे. 
> याही पुढे जात CIA प्रमुख म्हणाले, आम्ही दिलेल्या टार्गेटवर पाकिस्तानने अद्याप लक्ष्य केलेले नाही. पाकिस्तानात दहशतवाद्यांचे अड्डे चालू नये यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करणार आहोत असेही ते पुढे म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...