आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतून असे होते लादेनचे घर, लग्नाचा VIDEO; सीक्रेट फाइल्स अमेरिकेकडून चौथ्यांदा सार्वजनिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या घरातील अंगणात मुलांना टार्गेट प्रॅक्टिस शिकवताना... - Divya Marathi
आपल्या घरातील अंगणात मुलांना टार्गेट प्रॅक्टिस शिकवताना...
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेची सर्वोच्च गुप्तचर संस्था सीआयएने (Central Intelligence Agency) 9/11 चा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनच्या 4,70,000 फाइल्स आणि क्लिप्स सार्वजनिक केल्या आहेत. 2011 मध्ये अमेरिकेने जगातील सर्वात कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला पाकिस्तानात घुसून ठार मारले. त्याचवेळी ह्या फाइल्स आणि क्लिप जप्त करण्यात आल्या होत्या. सीआयएने फाइल्स सार्वजनिक करण्याची ही चौथी वेळ आहे. यात लादेनच्या पॉर्न फिल्म आणि कार्टून फिल्मचे कलेक्शनचा तसेच लादेनचा मुलगा हमजा याच्या लग्नाच्या व्हिडिओचा समावेश आहे. 

पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये लादेनच्या ठिकाणावर घुसून 2011 मध्ये अमेरिकेच्या नेवी सील कमांडोजने लादेनला ठार मारले होते. त्याचवेळी लाखो फाइल्स, सीडी, ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, हार्ड डिस्क, कित्येक पेन ड्राइव्ह आणि दस्ताऐवज जप्त केले. गेल्या 6 वर्षांत अमेरिकेने 4 टप्प्यांमध्ये अनेक फाइल्स आणि क्लिप सार्वजनिक केल्या. मात्र, त्यापैकी बरेच काही स्वतःकडेच लपवून ठेवले. ते जाहीर केल्यास अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका आहे असे सीआयएचे म्हणणे आहे. 

नवीन फायल्समध्ये नेमके काय?
> सीआयएच्या अधिकाऱ्यांनी डॉक्युमेंट सार्वजनिक करताना पत्रकार परिषद आयोजित केली. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, अलकायदाचा म्होरक्या राहिलेल्या लादेन आणि सध्याच्या इस्लामिक स्टेट दहशतवाद्यांध्ये पूर्वीपासूनच मतभेद होते. 
> अलकायदाचा म्होरक्या लादेनला 2011 मध्ये ठार मारण्यात आले, त्यावेळी इस्लामिक स्टेटचा इराकमध्ये फैलाव सुरू होता. अलकायदा आणि इसिसमध्ये धार्मिक, धोरणात्मक आणि विचारसरणीचे मतभेद होते हे नवीन कागदपत्रांतून समोर आले आहे. त्याचेळी अलकायदामधून बाहेर पडलेले दहशतवादी इसिसमध्ये सहभागी होत होते.
> सार्वजनिक करण्यात आलेल्या लादेनच्या कंप्युटरमध्ये लहान मुलांचे कार्टून, हॉलिवुड चित्रपट आणि पॉर्न मूव्हीज सापडल्या आहेत. 
> यासोबतच लादेनचा मुलगा हमजाच्या लग्नाचा व्हिडिओ देखील जारी करण्यात आला. त्यावेळी लादेनचा मुलगा हमजा वयाच्या विशीत होता. तो सध्या कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. 

पुढे, लादेनच्या घरातील लहान मुले, कोंबड्या आणि मुलाच्या लग्नाचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...