आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Civil War In Syria, 40 Lakh People Rehabilitated

सिरियाला गृहयुद्धाची झळ, ४० लाखाहून जास्त निर्वासित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्तंबुल - गृहयुद्धाची झळ बसल्यामुळे सिरियातून ४० लाखाहून अधिक नागरिकांना देश सोडावा लागला. गेल्या २५ वर्षांत एवढ्या मोठ्या संख्येेने निर्वासित होण्याची ही जगातील पहिली घटना आहे, असे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मानवी हक्काचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी चिंता व्यक्त झाली आहे.

तुर्की सरकारने केलेल्या पाहणीत सिरियातील नागरिकांची संख्या स्पष्ट झाली. देशांतर्गत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या ७० लाखाहून अधिक आहे. त्यांना घरेदारे सोडून देशातील इतर भागात जावे लागले आहे. तुर्कीमध्ये सिरियातील मोठा विस्थापित झालेला समुदाय आला आहे. खरे तर या नागरिकांना सर्वच आघाड्यांवर जगाच्या मदतीची अतिशय गरज आहे. त्यानंतरच सिरियातील नागरिक दारिद्र्यातून बाहेर पडू शकतील.